Breaking
ब्रेकिंग

उचापती मास्तरची “खदखद” उफाळताच झाला “गदगद” ; आव्हानात्मक भाषाचं ठरली महाप्रसादास कारण ; सुकळी येथे घडला नाट्यमय राडा

2 0 3 7 4 9

किशोर कारंजेकर

वर्धा : – आपल्या शिवराळ आणि आव्हानात्मक भाषेच्या माध्यमातून अनेक विषयांवर तोंडसुख घेणाऱ्या “खदखद” मास्तरला अखेर महाप्रसाद मिळाला आणि तो “गदगद” झाल्याची धक्कादायक घटना काल सुकळी येथील हनुमान मंदिराच्या परिसरात भरदुपारी घडली. सदर प्रकारामुळे मात्र जिल्ह्यात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

      प्राप्त माहितीनुसार, काल मंगळवारी सुकळी(बाई) येथील हनुमान मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याकरिता वर्ध्यातील सुप्रसिद्ध “खदखद” गुरुजी देखील आपल्या परिवारासह पोहचले. मात्र तेथे पोहचताच मास्तरच्या अंगी असलेली “खदखद” पुन्हा उफाळून आली. वास्तवात धार्मिक ठिकाणी यासारख्या गोष्टींवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. परंतु गुरुजींनी नियंत्रण रेषेची सिमा ओलांडली आणि घडला राडा. मास्तरच्या आव्हानानंतर शांत असणारे एका संघटनेचे पदाधिकारी असे काही भडकले की त्यांनी थेट “खदखद” उफाळणाऱ्या मास्तरच्या कानशिलातचं हाणली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर चांगलेच हातघाईवर आले होते.

     परंतु उपस्थित काही सुज्ञ नागरिकांनी उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे सांगितले जाते. सदर घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून “कही खुशी, कही गम” असे चित्र निर्माण झाले आहे.

4.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे