Breaking
ब्रेकिंग

कपाशीच्या “कबड्डी” आणि “पंगा” नामक वाणाच्या नावाखाली “लिंकींग”चा खेळ ; कृषी विभागाचे दुर्लक्ष

2 2 5 3 8 1

सचिन धानकुटे

सेलू : – कपाशीच्या “कबड्डी” आणि “पंगा” नामक वाणाच्या नावाखाली कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांशी “लिंकींग”चा खेळ खेळत असून याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

     कपाशीचे वेगवेगळ्या कंपनीचे बीयाणे सध्या बाजारात उपलब्ध आहे. परंतु कृषी केंद्रचालक सध्या शेतकऱ्यांची पसंती लक्षात घेऊन काळ्या बाजारासाठी साठेबाजीला खतपाणी घालत असल्याचे चित्र निर्माण झाले. कपाशीच्या ज्या वाणाची मागणी आहे, नेमक्या त्याच वाणासाठी शेतकरी भटकताना दिसतात. सेलू तालुक्यात कपाशीच्या “कबड्डी” आणि “पंगा” नामक वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु त्या तुलनेत शेतकऱ्यांना ते बीयाणे सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. शहरातील केवळ एका कृषी केंद्र चालकांकडे वरील दोन्ही वाण उपलब्ध असून तो शेतकऱ्यांना यासाठी वेठीस धरत आहे. शेतकऱ्यांना बीयाणे मिळेल, परंतु त्यासाठी तो जे म्हणेल ते जबरदस्तीने खरेदी करावे लागेल, अन्यथा बीयाणे मिळणार नाही, असा फतवाचं “त्या” कृषी केंद्र चालकाने काढला आहे. एकप्रकारे त्या वाणांचा तुटवडा असल्याचे चित्र उभे केले जात असून काळ्या बाजाराला निमंत्रण दिले जात आहे. सदर वाणांचा तुटवडा असल्याचे भासवून त्याची जादा दराने विक्री होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

कबड्डीचा गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दगा

    कपाशीच्या “कबड्डी” नामक वाणाचे तीदस्ता चांगले उत्पादन झाले खरे.. मात्र गेल्या वर्षी शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागला. याकरिता बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या वाणाकडे पाठ फिरवली असली, तरी अजूनही काही शेतकऱ्यांत त्या वाणाची अद्याप क्रेझ कायम आहे. शेतकऱ्यांच्या नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी कृषी केंद्र चालकांनी कंबर कसली असून ते सदर वाणाच्या नावाखाली “लिंकींग”ला खतपाणी घालत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 3 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे