चन्नावार्स ई विद्या मंदिरात जन्माष्टमी सोहळा उत्साहात
किशोर कारंजेकर
वर्धा : – येथील चन्नावार्स ई विद्या मंदिराच्या प्री-प्रायमरी शाखेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धा येथील चन्नावार्स ई विद्या मंदिरातील प्री-प्रायमरीच्या बालगोपालांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करीत राधा आणि कृष्णाची भूमिका साकारून उत्सवात भर टाकली. शाळेच्या जन्माष्टमी उत्सवामध्ये एक रोमांचक असा ‘दहीहंडी’चा कार्यक्रम देखील समाविष्ट होता, जो या शुभ प्रसंगाचे खास वैशिष्ट्य होता.
चन्नावार्स ई विद्या मंदिर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि भारतीय परंपरा अखंडपणे जपण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे. सदर कार्यक्रम मुलांसाठी त्यांच्या सवंगडी आणि शिक्षकांसोबत नृत्य करण्यासाठी आणि आनंदाच्या क्षणांच्या गोड आठवणी जपुन ठेवण्यासाठी एक व्यासपीठ असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश चन्नावार यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शुभांगी चन्नावार, मुख्याध्यापिका अपूर्वा पांडे, उपमुख्याध्यापिका पूजा कपूर, प्रभारी ममता जैस्वाल आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.