ब्रेकिंग
या कारणाने ‘तो’ बिबट्या मृत्यूमुखी : अश्या चर्चा आल्या समोर

1
2
8
4
4
9
किशोर कारंजेकर
वर्धा : वर्ध्याच्या हिंदी विश्व महाविद्यालय परिसरात काल धुमाकूळ घालणारा बिबट्या आज मध्यरात्री दीड वाजता मरण पावला. कावीळ आजाराने तो मरण पावला असल्याची माहिती पीपल्स फॉर ऍनिमल्सचे आशिष गोस्वामी यांनी दिली.
हिंदी विश्व महाविद्यालयात काल वर्धेकरांना भरदिवसा व्याघ्रदर्शन झाले होते. पीपल्स फॉर ऍनिमल, वनविभाग, पोलिसांची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचून बिबट्याला भूलचे इंजेक्शन देऊन पकडले होते. त्यानंतर बिबट्यावर करुणाश्रमात उपचार सुरू होते. कालच त्याच्या रक्ताचे नमुने नागपूरला तपासणीकरिता पाठविले होते. तपासणी अहवालात बिबट्याला कावीळ आजार झाला असून तो चौथ्या टप्प्यात असल्याचे नमूद आहे. बिबट्याच्या मृत्यूनंतर शहरात अनेक उलट सुलट चर्चेला बिंग फुटले असून या चर्चा कितपत सत्य होत्या. हे आत्ता शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
1
2
8
4
4
9