Breaking
ब्रेकिंग

कबड्डीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत मुलांमध्ये मदनी दिंदोडा तर मुलींमध्ये हिंगणघाटचा संघ ठरला अव्वल

1 9 7 0 9 5

सचिन धानकुटे

सेलू : – कबड्डीच्या जिल्हा स्तरावरील निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये मदनी दिंदोडा तर मुलींमध्ये हिंगणघाटच्या संघाने बाजी मारली. तीन दिवसीय या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ४० संघानी आपला सहभाग नोंदवला. रविवारी अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याने स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

             येथील दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मैदानावर कबड्डीची जिल्हा स्तरावरील निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेचा समारोप रविवारी मध्यरात्री करण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४० संघ सहभागी झाले होते. तीनही दिवसांतील साखळी सामन्याच्या नंतर उपांत्य फेरी व त्यानंतर फायनलचा सामना घेण्यात आला. मुली तसेच मुलांच्या अंतिम सामन्यावेळी भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थितीत मुलींच्या हिंगणघाट येथील शिवछत्रपती क्रिडा मंडळाच्या संघाने तर मुलांच्या स्पर्धेत मदनी दिंदोडा येथील संघाने दणदणीत विजय मिळवला. मुलींच्या संघात गर्जना क्रिडा मंडळाच्या संघाने द्वितीय, पुलगांव येथील आर के क्रिडा मंडळाच्या संघाने तृतीय तर सेलू येथील रामा स्पोर्टिंग क्लबच्या संघाने चवथ्या स्थानावर विजय मिळवला. मुलांच्या स्पर्धेत आष्टी येथील तानाजी क्रिडा मंडळाला द्वितीय तर कोपरा येथील शिवाजी क्लबला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

     साहसिक जनशक्ती संघटना, गर्जना सामाजिक संघटना व वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा प्रथमच सेलू तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या दरम्यान अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली. यात खासदार रामदासजी तडस यांनी रविवारी दुपारी पार पडलेल्या उपांत्यपूर्व लढतीचा आनंद घेतला. बक्षीस वितरण सोहळ्याला साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, गर्जना सामाजिक संघटना तसेच वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेशसिंग ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे, भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक पवन तिजारे, महावितरणचे चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता रवींद्र वांदिले, अभियोक्ता अमोल कोटंबकार, वाहितपूरचे माजी सरपंच सुभाष डायगव्हाणे, डॉ बजरंग मसराम, चौधरी सर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान उत्कृष्ट संघाना चषक तसेच उत्कृष्ट खेळाडू, रेडर, पंच यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचे संचालन कैलास बिसेन व संयोजक सागर राऊत यांनी केले. यशस्वितेसाठी धनराज सयाम, मंगेश रामटेके, जगदीश रोकडे, गणेश खोपडे, प्रकाश बडेरे, प्रकाश कोटंबकार, बाळा टालाटुले, अशोक कांबळे सह अनेकांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे