वर्ध्यात ‘मौत का कुआ’चा उदय : भोसा गावात विहिर खचून मलब्याखाली दोन मजुर दबले : दबलेल्यांना काढण्यात येणार उद्या

किशोर कारंजेकर
वर्धा : वर्धा जिल्ह्यात विहीर खचल्यामुळे दोन मजूर विहीरीतील मलब्याखाली दबल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विहिरीतील मलब्याखाली दाबलेल्यांना उद्या काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) नजीकच्या भोसा येथे ही धक्कादायक घटना घडली असून भोसा परिसरातील विहिरीत रिंग टाकण्याचे बांधकाम सुरु होते. गौळ भोसा गावात विहिरीचे काम सुरू असताना मलब्याखाली दबले दोन मजूर दबले असल्याचे सांगण्यात येते. मलब्याखाली गुदमरुन दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. शेतातील विहिरीचे बांधकाम 5 मजुरांकडून केले जात होते. त्यापैकी 3 मजूर किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. 50 फूट खोल खोदण्यात आलेली विहीर एकप्रकारे मौत का कुआ ठरली असल्याचे बोलले जात आहे.
मृतदेह काढण्यासाठी एन डी आर एफ चमुसह पोलीस उपविभागीय अधिकारी, महसूल विभाग दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
विहिरीच्या बांधकामासाठी शेतकऱ्यासह पाच जण कार्य करीत होते; सुदैवाने इतर तिघांचे प्राण वाचले आहे. मृत मजुरांमध्ये 40 वर्षीय अमोल दशरथ टेंभरे, 28 वर्षीय पंकज प्रभाकर खडतकर यांचा समावेश असल्याची माहिती आहे.