Breaking
ब्रेकिंग

कॅमेऱ्याची दिव्यदृष्टी लाभलेला पोलीस खात्यातील “संजय”

2 5 4 3 1 7

Dकिशोर कारंजेकर 

वर्धा : खाकी वर्दीतील सेवानिष्ठता, याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच संजय देवरकर नावाचा पोलीस खात्यातून अलीकडेच सेवानिवृत्त झालेला पोलीस उपनिरीक्षक.

शिपाई पदापासून ते उपनिरीक्षक पद अत्यंत निरीच्छ भावनेने त्यांनी कर्तव्य म्हणून उपयोगात आणले. छायाचित्र काढणे म्हणजे कॅमेऱ्याचा सखासोबती. यातूनच जिल्ह्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचे साक्षदार संजय देवरकर आहे.

छायाचित्र घेण्याच्या वेळी कॅमेऱ्याचा अचूक फोकस करता करता त्यांची सात्विक जीवन निष्ठतेवरची वृत्तीही फोकस झाली आणि मग दोन्हीही म्हणजे सौजन्य आणि शालिनता हातात हात घेऊन त्यांच्या रूपाने वावरू लागल्या. हे सगळेच करित असतानाच त्यांच्या प्रत्येक व्यवहाराला सौजन्यांची वृत्ती झालर रुपेरी किनार म्हणून जीवन फुलवून गेली. कोणाचीही मने दुखावणार नाही, याची काळजी घेतांना अनेक चढउतार किंबहुना वेदणादायी प्रसंग अनुभवले तरी त्यांनी मनाचा तोल ढळू दिला नाही.

चेहऱ्यावरची स्मितरेषा बदलू दिली नाही. यामुळे पोलीस खात्यात कित्येकदा निसर्गतः येणारी आढ्यता त्यांच्या सावलीतही वावरू शकली नाही. हे करीत असताना त्यांनी अनेकांना मायेची सावली दिली. यात कर्तव्याच्या वर्षाची 36 पाने कशी उलटली याचा त्यांनाही पत्ता नसेल पण प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा, हा सोज्वळ, साधाभोळा माणुस आपल्यासोबतच असावा, अशी प्रत्येकाच अधिकाऱ्याची भावना होती. निवृत्तीचे वय आणि कामाची निवृत्ती या दोन वेगवेगळ्या बाबी आहे. यामुळे पुढील काळात संजय देवरकर समाजाला पोलीस यंत्रनेने दिलेला एक उत्कृष्ट छायाचित्रकार, कॅमेरामन गवसला आहे. त्यांच्या वृत्तीत सेवानिवृत्ती नाही, यामुळे उर्वरित काळ त्यांनी अधिक सक्रियतेने कॅमेऱ्यासह वावरावे अशीच अपेक्षा समजमनातून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला RNN चा सॅल्यूट आणि पुढील काळातील यशस्वी वाटचालीला शुभेच्छा…..

संजय देवरकर यांचा कार्यकाळ

१९८७ ची पो.भरती. ३९३ बक्षिसे.. शिक्षा नाही. डी. जी. इन सिग्निया मेडल २०१९ ला मिळाले. Police सब इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले. तसेच २००४ ला पुणे येथे बेस्ट टीम all round performance in videography. ही पदवी मिळाली.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 3 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे