रेती चोरी प्रकरणात २६ लाखांचा मुद्देमाल जप्त ; ७ जणांवर कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रेती चोरी प्रकरणात शुक्रवारी २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत ७ जणांवर कारवाई केली. हिंगणघाट येथील कवडघाट परिसरात ही कारवाई करण्यात आली.
हिंगणघाट येथील कवडघाट परिसरातील वणा नदीच्या पात्रातून रेतीची अवैधरित्या चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी काल शुक्रवारी कवडघाट परिसरात पाहणी केली असता यावेळी चार ट्रॅक्टरसह ट्रॉलीतून रेती चोरी होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सगळी वाहने ताब्यात घेत एक ब्रास ७० फुट रेती असा एकूण २६ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राजेश पढालसह सहा जणांवर भांदवि कलम ३७९, ५११, १०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे रोशन निंबाळकर, अवि बनसोड, सागर भोसले, संजय राठोड, हर्षल सोनटक्के, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, अभिषेक नाईक, मंगेश आदे आदि कर्मचाऱ्यांनी केली.