स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत गांजासह दाऊद गजाआड
सचिन धानकुटे
वर्धा : – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल केलेल्या कारवाईत ९२६ ग्रँम गांजासह एकास अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. दरम्यान त्यांनी शहरातील तारफैल परिसरातील एका घरी एनडीपीएस कायद्या अंतर्गत धाड टाकली. यावेळी दाऊद अली उर्फ बंपर रहमान अली(वय४४) ह्याच्या घरझडतीत ९२६ ग्रँम गांजा पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर गांजा हा दाऊदने पिली नदी, नागपूर परिसरातील भुरुब्बा नामक इसमाकडून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितल्याने शहर पोलीस ठाण्यात दोघांवरही विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, सचिन इंगोले, प्रदिप वाघ आदि कर्मचाऱ्यांनी केली.