धर्मसेवा प्रतिष्ठानच्या बालसंस्कार शिबीराचा २१ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
सचिन धानकुटे
वर्धा (ता.१९) : – समाजसहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने काल शुक्रवारी बोरगांव(मेघे) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बालसंस्कार शिबीर घेण्यात आले. यावेळी परिसरातील २१ विद्यार्थ्यांनी या बालसंस्कार शिबिराचा लाभ घेतला.
धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप, अन्नदान, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, आरोग्यविषयक तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. संस्कारक्षम पिढी तयार व्हावी हा व्यापक दृष्टिकोन ठेवून न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. न्यासाच्या वनिता हिंगे यांनी अतिशय सोप्या भाषेत यावेळी मुलांचे प्रबोधन केले. न्यासातर्फे लतादेवी तिवारी यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचा लाभ परिसरातील २१ विद्यार्थ्यांनी घेतला.