Breaking
ब्रेकिंग

कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याआधीच कार्यकारी अभियंता पेंढे यांनी काढले कामाचे टेंडर, भरली थैली : धुनिवाले चौकातील बंगल्यात बसून केले कामांचे वाटप : पाच पेट्यांत बांधकामच्या वरच्या मजल्याने तळमजल्याला मॅनेज केल्याची चर्चा : बांधकाममधून पाच बुके, एकदम ओके`, ही म्हण होत आहे, जिल्हा परिषदेत रूढ : सांगा रोहण घुगे साहेब, चौकशी करणार की चौकशीच्या फार्सचे चित्र रंगविणार : धुनिवाले चौकातल्या बंगल्यात तर दिवसाच पैशाचा खेळ चाले, पुन्हा काही कागदपत्रांना फुटली वाचा

2 5 4 4 4 5

किशोर कारंजेकर

वर्धा : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कागदपत्रांना पाय फुटण्याचे थांबत नाही. प्लंबरला टेंडरक्लर्क करण्याचा पराक्रम कार्यकारी अभियंता पेंदे यांनी विवेकाने केल्याचे दाखविले पण प्लंबरचे कार्यकौशल्य कच्चे निघाले, त्यातून थेट कार्यकारी अभियंत्यांच्याच नव्हे तर याच कार्यालयाच्या लेखा विभागातूनही काही कागदपत्रे लिकेज होत ती बाहेर आली. याचा आढावा घेतला जाणारच आहे पण पहिल्यांदा टेंडर मॅनेजचा विषय महत्त्वाचा आहे. तो चर्चेला घेऊ.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांनी काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याआधीच कामाचे टेंडर काढून त्या कामाचे वाटपही केले. याकरीता कार्यालयातील गणेश नावाच्या कारकुनाला विवेक पेंढे यांनी त्यांच्या धुनिवाले चौकातील फ्लॅटवर बोलावून घेतले होते. सारा किस्साच मजेदार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हे सारे किती मायेने पोटात घालणार, संरक्षण देणार, हाच खरा प्रश्न आहे.
धुनिवाले चौकातील पेंढेच्या फ्लॅटवर कामाचे सौदे झाले. त्यावेळी गणेशला त्याचा मोबाईल स्वीच ऑफ ठेवायला सांगितले गेले. गणेश टेंडर फॉर्मची पावती करीत होता. इकडे कार्यकारी अभियंता पेंंढे मी तयारच आहो, म्हणत, ठेकेदाराला बोलावून घेत होते. तशी कामाची विक्रीच सुरू होती.
धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकामच्या वर्धा उपविभागातील रस्ता गैरप्रकाराच्या कामाची `चौकशी` करायला गेले होते. कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांनी तातडीने मला नागपूरला जायचे आहे, सांगून गणेशसोबत धुनिवाले चौकातील फ्लॅटवर भरदुपारी दोन वाजता हा धक्कादायक प्रकार सुरू केला होता. त्याचवेळी बांधकामच्या `वर`च्या मजल्याने मी `तळ`मजला पाच पेट्यांत मॅनेज केल्याची ग्वाही दिली गेली. गणेश याची साक्ष देत होता. पेंढेची पोतडी भरली जात होती. तो टेंडर फार्मची पावती फाडत होता. या कामांना प्रशासकीय मान्यता न मिळताच पेंढे यांनी २२ फेब्रुवारीलाच या कामांचे टेंडर काढले. यात अंगणवाडीच्या किरकोळ दुरुस्तीची कामे आहेत. ५०५४ आणि ४८९२ (ओडीआर) इतर जिल्हा मार्गाची तसेच ३०५४ आणि २२६८ ची ग्रामीण मार्गाची (व्हीआर)कामे आहेत. याचे वाटप विवेक पेंढेच्या बंगल्यातून झाले. यातील काही कामांना १ मार्च २०२३ ला प्रशासकीय मान्यता मिळाली. पण प्रशासकीय मान्यता मिळण्याआधीच पैशाच्या लालसेतून या कामाचे टेंडर कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांनी २२ फेब्रुवारी २०२३ लाच काढले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी रोहन घुगे यांनी चौकशीचे नाटक न रंगविता विवेक पेंढे यांचीच चौकशी याबाबत करून दाखवावी. जी कामे मॅनेज झाली त्यात २२-२३ मधील नवीन अंगणवाडी बांधकाम, डीपीसीसी (जिल्हा वार्षिक योजना)अंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम, डीपीसीसी अंतर्गत प्राथमिक शाळा दुरुस्ती कामे, नवीन वर्गखोली बांधकाम, शाळांतील शौचालय बांधकामांचा समावेश आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता १ मार्चला मिळाली असता या कामांचे टेंडर २२ फेब्रुवारीला करण्याची हिंमत तळमजल्याला पाच पेट्यांत मॅनेज करण्यातून आली काय, याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे.
मजेदार किस्सा म्हणजे एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने याबाबत कार्यकारी अभियंता विवेक पेंढेला फोन करून` हे काय सुरू केले, आमचे डोळे उघडे नाही काय`, असा खडसावून जाब विचारला तेव्हा विवेक पेंढेची बोबडीच वळली होती. मी तुम्हाला भेटतो म्हटले, त्यावर या नेत्याने पुन्हा भेटतो म्हणाल तर खबरदार, विकाऊ जिल्हा परिषदेचा कारभार असेल, मी नाही, असे खडसावले. तेव्हापासून या नेत्याची मनधरणी कशी करावी, याकरीताच्या मध्यस्थांचा विवेक पेंढे शोध घेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा अलीकडेच पार पडल्या. त्या मैदानावर झाल्या, त्याच वेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात टेंडर मॅनेजसह विविध भ्रष्टाचाराचा क्रिडा त्याचे कौशल्य दाखवित वळवळत होता. या क्रिडा कौशल्याचा करंडक बांधकामच्या कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांनी तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकांनी संयुक्तपणे स्वीकारावा, अशी उपरोधिक चर्चा जिल्हा परिषदेतच रंगत होती.
प्लंबरचा टेंडर क्लर्क करून त्याच्या हाताने आर्थिक रसदीची पाईपलाईन बांधकाम विभाग कार्यालयातून थेट तळमजल्यावरच्या नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आलेल्या वातानूकुल कोणत्या कक्षात पोहोचली, याचीही खमंग चर्चा रंगत आहे. काहीही असले तरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कागदपत्रांना पाय फूटण्याचे थांबत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे यांनी वर्धा उपविभागातील रस्त्याचे काम पाहिले आहे, त्यांनी रस्त्याच्या कामात निखिल शेरजे या विवेक पेंढेच्या चाहत्या कनिष्ठ अभियंत्याने जीएसबीचा अ‍ॅटम वापरला काय, याची चौकशी करावी.
तीन मोजणीपुस्तकातील गैरप्रकार पुन्हा हाती आले आहेत. त्यात निखिल शेरजे, मलमकर, वनस्कर या कनिष्ठ अभियंत्यांनी मोजणीपुस्तकातील पानांवर कामांचे मोजमाप नोंदविले आहे. त्यातील एकावर शाळा दुरुस्तीचे काम रेकॉर्ड केले आहे. त्यावर विवेक पेंढेने चेक अ‍ॅण्ड फाऊंड करेक्ट दाखविले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे, कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांनी कागदपत्रे फूटू नये, याबाबत सूचना देण्याऐवजी कागदपत्रांत गैरप्रकाराची नोंद होणार नाही, याची काळजी घेणे तसेच विवेक पेंढेसमोर अगतिक होणे थांबविणे गरजेचे वाटते.
विवेक पेंढेच्या समोर मुख्य कार्यकारी अधिकारी अगतिक का? याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे. काहीही असले तरी जिल्हा परिषदेच्या १९६२ पासूनच्या कारकीर्दीतील सर्वांत बदनाम कारकीर्द, असा लौकिक, या राजवटीने मिळविला आहे, असेच सगळे बोलत आहे.
नव्याने हाती आलेल्या पुराव्याची खात्री पटताच क्रमश: पुराव्याच्या मांडणीसह भंडाफोड केला जाणारच आहे. पुरावे असूनही कारवाई न करण्याचे धोरण अयशस्वी करीत जनतेच्या निधीला योग्य मार्गे जनतेच्या हिताकरीता वळवायचच आहे. त्याचवेळी हा निधी हडपण्याचे तसेच त्याला संरक्षण देण्याचे इरादे हाणूनही पाडायचेच आहे. याकरिता RNN सज्ज राहील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे