कनिष्ठ अभियंत्याला एक हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक.!

किशोर कारंजेकर
वर्धा : देवळी तालुक्यातील अडेगाव येथील 33 के.व्ही. वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे यांना त्यांचे कार्यालयात वर्ध्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
गौळ येथील तक्रारदार शेतकरी यांचे मौजा गौळ ता. देवळी येथील शेत सर्वे 80 आराजी 4.05 हेक्टर शेती आहे. त्या ठीकाणी शेतामध्ये कॅनलवरुन ओलीताकरीता पाणी घेण्याकरिता शेतात लवकर विद्युत मिटर लावण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांकडून 1000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदार यांना ही लाच द्यायची नसल्याने त्यांनी वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून आज नागपुर येथील पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर याच्यां मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदिप थडवे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बावनेर, पोलीस हवालदार संतोष बावणकुळे, पोलीस शिपाई कैलास वालदे, प्रितम इंगळे यांनी कारवाई करून घटणास्थळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.