तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आमदार डॉ पंकज भोयर कटिबद्ध..! केळझर आणि घोराड येथे माजी खासदार नवनित राणांच्या उपस्थितील महाआरतीसह भूमिपूजन
सचिन धानकुटे
सेलू : – विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील श्रीक्षेत्र घोराड व केळझर येथील सिद्धिविनायक मंदिर ह्या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आमदार डॉ पंकज भोयर यांचा नेहमीच पुढाकार राहीला. त्यांच्या विशेष प्रयत्नातून केळझर येथील सिद्धीविनायक मंदिर परिसरात केलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे लोकार्पणासह गणेश मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम मंगळवारी सांयकाळी सहा वाजता आयोजीत करण्यात आला आहे. यासोबतच घोराड येथील २ कोटी १० लाख रुपयांच्या विकासकामाचे लोकार्पण तथा नव्याने हाती घेतलेल्या कामाचे भूमीपूजन सायंकाळी सात वाजता माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गावातील ग्रामसंघाचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार देखील करण्यात येणार आहे.
आपल्या विकासकामांच्या माध्यमातून वर्धा-सेलू विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्यसम्राट आमदार डॉ पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नामुळे १ कोटी २० लाख रूपये खर्चून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सौर पथदिवे तथा सौंदर्यीकरणाच्या कामाचे लोकार्पण तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मागे नदीजवळ रस्ता व पूर संरक्षण भिंत बांधकाम व इतर विकास कामाचे भूमिपूजन आज मंगळवारी सायंकाळी होत आहे. यासाठी ९० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलायं. सदर कार्यक्रमाला अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार नवनीत राणा, माजी खासदार रामदास तडस, आमदार डॉ पंकज भोयर, माजी सभापती अशोक मुडे, भाजपा तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष तथा हिंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच दामीनी डेकाटे, माजी सरपंच ज्योती घंगारे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.