Breaking
ब्रेकिंग

कु. पूनम बन महामहीम राज्यपालांचे हस्ते सन्मानित

2 6 8 6 2 1

नारायणपूर : – येथील पूनम वाल्मीकराव बन हीने गोंडवाना विद्यापीठातून एमएससी रसायनशास्त्र या विषयात विशेष प्राविण्य प्राप्त केले. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातून ती पहिली मेरिट आल्याने तीला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्णपदकाने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

    ग्रामीण भागातील कुमारी पूनमचे महाविद्यालयीन शिक्षण हे वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात झाले आहे. पूनमने आपल्या यशाचे श्रेय आईवडीलांसह आपल्या गुरुजनांना दिले असून अभ्यास केल्यास यशाची पायरी सहज गाठता येते, असे पूनमने यावेळी बोलताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 6 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे