Breaking
ब्रेकिंग

सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक..! कामगार अधिकारी अन् दलालांच्यात साटेलोटे

2 6 8 9 1 8

किशोर कारंजेकर

वर्धा : – येथील कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि दलालांच्यात एकप्रकारे साटेलोटे असून सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलायं. 

     बांधकाम कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सगळीच प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. कामगारांना अर्ज दाखल करण्यापासून तर लाभ घेण्यापर्यंतचा सगळा प्रवास हा ऑनलाईन पद्धतीनेच होतोयं. परंतु यात काही दलालांचा सुळसुळाट असून त्यांचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात गोडीगुलाबीचे संबंध आहेत. नुसते गोडीगुलाबीचे संबंधचं नाही तर एकप्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी साटेलोटे आहे. 

    एखाद्या लाभार्थ्यांने जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला, तर या कार्यालयातील लाचखोर अधिकारी व कर्मचारी त्यात त्रुटी काढून तो अर्ज नामंजूर करतात. मात्र तोच अर्ज एखाद्या भाडखाऊ दलालाच्या माध्यमातून सादर केला, तर मात्र त्याच अर्जास हिरवी झेंडी मिळते. सेलू येथील एका लाभार्थ्यांने नुकताच ऑनलाईन अर्ज सादर केला होता. त्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील हरामखोरांनी “सक्षम प्राधिकाऱ्याची स्वाक्षरी व शिक्का अस्पष्ट असून ओळखता येत नसल्याचा कांगावा” केला. मात्र तोच अर्ज एखाद्या दलालाच्या मार्फत गेल्यास ह्याच कार्यालयात बिनबोभाटपणे मंजूर होतोयं. त्यामुळे कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व दलालांच्यात एकप्रकारे साटेलोटे असल्याचे दिसून येते. कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दलालांकडून असं कोणतं गाजरं दाखवलं जातेयं की त्यांचे अर्ज लगेच मंजूर होतात आणि लाभार्थ्यांनी थेट ऑनलाईन अर्ज केल्यास ते नामंजूर होतात. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे असून बांधकाम कामगारांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविणे गरजेचे आहे.

 

*६० हजारांच्या स्कॉलरशिप मध्ये दलालांचे कमीशन २५ हजार*

 कामगारांच्या पाल्यांना बांधकाम कल्याणकारी महामंडळातील योजनांच्या माध्यमातून स्कॉलरशिप दिल्या जाते. यात देखील दलालांचा “रेट” ठरला असून यातील मलिंदा कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या जात असल्याने बांधकाम कामगारांच्या नावाखाली दलाल अन् कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध माया गोळा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ६० हजारांच्या स्कॉलरशिप साठी दलालांचा रेट हा २५ हजार रुपये असल्याचे एका लाभार्थ्यांने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर आरएनएनशी बोलताना सांगितले. त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील लाचखोरीचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आलायं हे तीतकेच खरे..!

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे