Breaking
ब्रेकिंग

व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल म्हस्के तर विभागीय अध्यक्षपदी किशोर कारंजेकर : व्हॉईस ऑफ मीडियाची निवडणूक उत्साहात

2 6 6 6 6 0

वर्धा : – जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया नुकतीच काल निवडणुकीच्या माध्यमातून पार पडली. या निवड प्रक्रियेत बुलढाण्याचे अनिल म्हस्के पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली तर जळगांवचे दिगंबर महाले यांची सरचिटणीस पदावर वर्णी लागली. कार्याध्यक्षपदी नंदुरबारचे योगेंद्र उर्फ नाना दोरकर, परभणीचे विजय चोरडिया आणि चंद्रपूर येथील सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश खाटीक यांची तर राज्य उपाध्यक्ष म्हणून सोलापूरचे अजितदादा कुंकुलोळ यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाली. यासोबतच यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत वर्ध्याचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर यांची मोठ्या मताधिक्याने विदर्भ विभागाच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड झाली.

   मागील एक महिन्यापासून व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. सदर निवडणुकीमुळे राज्याची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाली होती. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सरांनी भारतातल्या संपूर्ण राज्य कार्यकारिणीच्या निवडणुका येत्या काळात होणार असे आधीच जाहीर केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात सुद्धा हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ॲड संजीवकुमार कलकुरी आणि सीए सुरेश शेळके या दोघांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. राज्यभरातल्या राज्य कार्यकारिणीतील सदस्य, जिल्हाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष तसेच संपूर्ण तालुका अध्यक्ष अशा प्रमुख तीनशे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मतदार म्हणून आपली भूमिका बजावली. सदर निवडणुकीत एकूण ९२ टक्के मतदान झालं. 

     यामध्ये आज जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार गेल्या तीन वर्षापासून उत्कृष्ट काम करणाऱ्या अनिल म्हस्के पाटील यांना मतदारांनी प्रथम पसंतीचे मत देऊन त्यांची पुनश्च एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून निवड केली. यावेळी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचे मतदान असे एकूण १३ क्रमांक १३ उमेदवारासाठी दिले होते. पहिल्या पसंतीच्या मतदानाला प्रदेशाध्यक्ष आणि मग इतर पसंती त्या त्या पदाप्रमाणे दिली होती. निवडणुकीच्या माध्यमातून जे पदाधिकारी विजयी झालेले आहेत, त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या पदांचा पदभार आता आला आहे. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले, कार्याध्यक्ष-मुख्य संयोजक तथा प्रशासकीय प्रमुख योगेंद्र दोरकर, कार्याध्यक्ष संघटन मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र-मुंबई आणि कोकण विजय चोरडिया, कार्याध्यक्ष संघटन विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय पडोळे, कोकण आणि मुंबई विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद टोके, विदर्भाचे विभागीय अध्यक्ष म्हणून किशोर कारंजेकर, मराठवाडा अध्यक्ष सतीश रेंगे पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, राज्य कार्यवाहक म्हणून संघटनेसाठी सदैव तत्पर आणि कर्तव्यदक्ष असणारे सर्वाचे लाडके अमर चोंदे यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली आहे. यानंतर उर्वरीत आठ जणांची राज्य कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष लवकरच घोषीत करणार आहेत. येत्या २९ सप्टेंबरला मुंबईच्या प्रेस क्लब येथे नियोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती आज प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले यांनी दिली. 

मी गेली तीन वर्ष पत्रकारांसाठी मेहनतीने काम करत होतो, ती मेहनत यानिमित्ताने कामाला आली. मला राज्यातील संपूर्ण पत्रकारांनी पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया याप्रसंगी नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी दिली. आजपासून संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी या बरखास्त करण्यात आल्या असून येत्या एक ऑक्टोबर पासून नवीन जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया सुरू होईल. अशी माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी दिली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे