Breaking
ब्रेकिंग

सावधान..! भरपावसात झोपलायं सार्वजनिक बांधकाम विभाग

2 7 8 0 6 6

सचिन धानकुटे

सेलू : – अपघात प्रवण स्थळाची सूचना देणारे फलकचं भरपावसात जमिनीवर लोळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग मात्र अद्याप अनभिज्ञ असून निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते.

     रेहकी रस्त्यावरील एका जिनींगच्या समोर अपघात प्रवण स्थळ आहे. येथील रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने माती खाल्ल्याने संभाव्य अपघात प्रवण स्थळाची निर्मिती झाली. सदर रस्त्याची एक बाजू पूर्णतः उखडल्याने वाहनधारक सहसा एकाच बाजूचा वापर करतात. परिणामी वाहनं समोरासमोर येऊन बऱ्याचदा येथे अपघात घडतो. याठिकाणी आजपर्यंत अपघातात चौघांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जणांवर गंभीर जखमी होण्याची पाळी आली. त्यामुळे उशिरा का होईना, परंतु स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभागाला जाग आली आणि त्यांनी याठिकाणी दोन्ही बाजूंनी अपघात प्रवण स्थळाची माहिती देणारा सूचना फलक “सावधान” बसवला. 

     सदर सूचना फलक लावताना मुठभर खड्डा खणून केवळ फुटभर अंतरावरच गाडण्यात आलायं. त्यामुळे मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले सूचना फलक सध्या जमिनीवर लोळल्याचे दिसून येते. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे “सावधान” झोपल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. याठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही बाजूंचे सूचना फलक पडून आहेत. यांपासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मात्र अद्याप अनभिज्ञ असून निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 7 8 0 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे