Breaking
ब्रेकिंग

समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कठड्याला आयशरची धडक ; वाहनचालकाचा जागीच मृत्यू

2 0 3 7 4 9

सचिन धानकुटे

सेलू : – भरधाव आयशर ट्रक पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघातात वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील आमगांव-खडकी शिवारात घडली. हमीद आफताब सय्यद (वय२३) रा. अझीम पूरा, ता. केज, जिल्हा बिड असे सदर अपघातातील मृतक वाहनचालकाचे नाव आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, बिड येथील आरेश ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम एच ४४ यु २८०७ क्रमांकाचा आयशर ट्रक शिमला मिरची घेऊन जबलपूरला जाण्यासाठी निघाला होता. समृद्धी महामार्गावर वर्धा ते नागपूर दरम्यान पहिल्या लेनमधून जात असताना सदर ट्रकच्या वाहनचालकास अचानक पहाटेच्या वेळी झोपेची डुलकी लागली. त्यामुळे तो अनियंत्रित होत रस्ता दुभाजकाच्या मध्ये असलेल्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर जोरात धडकला. आमगांव-खडकी शिवारात आज बुधवारला पहाटे सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास सदर अपघात घडला. यात ट्रकच्या समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आणि यातील वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातानंतर वाहनचालकाचा मृतदेह ट्रकच्या कॅबिनमध्येच अडकल्याने तो काढण्यासाठी समृद्धी महामार्गावरील फायर अँड रेस्क्यू टीमच्या पथकाला पाचारण करण्यात आले. जाम येथील महामार्ग पोलिसांचे पथक तसेच सिंदी(रेल्वे) पोलिसांचे पथक देखील अपघातस्थळी दाखल झाले होते. अथक प्रयत्नानंतर वाहनचालकाचा अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी सिंदी(रेल्वे) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे आपल्या सहकाऱ्यासमवेत अधिक तपास करीत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे