Breaking
ब्रेकिंग

वर्धा जिल्ह्यांतर्गत पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या : रामनगरच्या ठाणेदारांची कारंजात बदल : ठाणेदार बंडिवार यांची बदलीची विनंती अमान्य

2 2 5 3 1 2

किशोर कारंजेकर 
वर्धा : जिल्हा पोलिस यंत्रणेत कार्यरत पोलिस निरीक्षक तसेच उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले. त्यात वर्ध्याचे ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांनी बदलीची केलेली विनंती अमान्य करण्यात आली. रामनगरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांची बदली कारंजाच्या ठाणेदारपदी करण्यात आली. तर त्यांच्याजागी नागपूरच्या पोलिस आयुक्त कार्यालयातून आलेले महेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

सिंदीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांची बदली सेवाग्रामच्या ठाणेदारपदी करण्यात आली आहे. वडनेरचे ठाणेदार कांचन पांडे यांची बदली वर्ध्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांची बदली प्रशासकीय कारणास्तव पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त मानव संसाधन केंद्र कल्याण कार्यालयाचा अतिरिक्त पदभारही सोपविण्यात आला. हिंगणघाटचे प्रभारी ठाणेदार कैलास पुंडकर यांच्याकडे हिंगणघाटच्या ठाणेदारपदाचा पदभार सोपविण्यात आला. रामनगरचे सहायक पोलिस निरीक्षक संजय मिश्रा यांची वडनेरच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली तर समुद्रपूरच्या सहायक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे यांची बदली कारंजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हिंगणघाटचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांची बदली आर्वी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तळेगावचे ठाणेदार आशिष गजभिये यांना तळेगावच्या ठाणेदारपदी कायम ठेवण्यात आले आहे. आर्वीच्या सहायक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने यांची बदली सिंदी रेल्वेच्या ठाणेदारपदी करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर यांची बदली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांची बदली सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक विनिता घागे यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे. वर्धा ठाण्यातील उपनिरीक्षक ज्योती देवकुळे यांची बदली हिंगणघाट पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रामनगर ठाण्यातील उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांची बदली हिंगणघाट ठाण्यात सेलूचे psi नितीन नलवडे यांची बदली अल्लीपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. आर्वीचे उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे यांची बदली वडनेर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अल्लीपूरचे उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे यांची बदली सेलू पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सेवाग्रामचे उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांची बदली वर्धा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सिंदीचे उपनिरीक्षक जयंत नगराळे यांची बदली आर्वी ठाण्यात तळेगावचे उपनिरीक्षक पवन भांबूरकर यांची बदली वर्धा आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली. हिंगणघाटचे उपनिरीक्षक दिपेश ठाकरे यांची बदली तळेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. वडनेरचे उपनिरीक्षक राजू सोनपितरे यांची बदली सिंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. समुद्रपूरचे उपनिरीक्षक रामदास खोत यांची बदली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत करण्यात आली आहे. उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर यांची बदली हिंगणघाट येथून कारंजा येथे करण्यात आली. उपनिरीक्षक विलास डोणेकर यांची बदली देवळी पोलिस ठाण्यात करण्यात आली. उपनिरीक्षक अनुराधा फूकट यांची बदली रामनगरच्या पोक्सो सेलमध्ये करण्यात आली आहे. हर्शल नगरकर यांना आर्वी पोलिस ठाण्यात पदस्थापना दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 3 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे