Breaking
ब्रेकिंग

वर्ध्यात होळीच्या आधीच शिमगा..! खासदार आणि उपसरपंचाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

2 5 4 4 4 4

सचिन धानकुटे

वर्धा : – होळीच्या एक दिवस आधी खासदार रामदास तडस आणि परडा येथील उपसरपंच प्रविण महाजन यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे होळीच्या आधीची ही शिमग्याची बोंबाबोंब जिल्ह्यात चांगलीच चर्चेचा विषय ठरली.

       समुद्रपूर तालुक्यातील परडा येथील उपसरपंच प्रविण महादेवराव महाजन यांनी खासदार रामदास तडस यांना फोनवरून सरकारच्या चुकीच्या धोरणावरुन चांगलेच धारेवर धरले. यावेळी महाजन यांनी उपस्थित केलेल्या सवालांमुळे खासदारांना देखील चांगलाच घाम फुटला. नरेगाच्या मुद्यावर खासदारांनी केंद्र सरकारची बला राज्य सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु महाजन यांनी उलट प्रश्न करताच खासदारांची बोलतीच बंद झाली. यावेळी सरकारच्या आयात-निर्यात धोरणांबाबत देखील खडे सवाल करण्यात आलेत. तेव्हा मात्र हद्दच झाली, खासदारांनी आमचं कोणी ऐकतचं नसल्याचं स्पष्ट केलं. विरोधात बोललात तर आम्हाला घरी बसण्याचा सल्ला मंत्री देत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच या ऑडिओ क्लिपमध्ये खासदारांच्या चेहऱ्यावर बारा वाजल्याचे स्पष्ट जाणवते. सदर ऑडिओ क्लिप सध्या त्यांच्या विरोधकांसाठी “सोने पे सुहागा” ठरली असून सवाल उपस्थित करणारे उपसरपंच महाजन शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे कळते. 

     यासंदर्भात परडा येथील सरपंच रमेश मडावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वादग्रस्त ऑडीओ क्लिपशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. परंतु उपद्व्याप आमच्या उपसरपंचानी केला आणी माझी मात्र जिल्ह्यात नाहक बदनामी होत असल्याची लिखित प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे होळीच्या आधीच जिल्ह्यात शिमगा रंगल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे