Breaking
ब्रेकिंग

महाठग कमलेश धोटे व गजानन सातवपासून नागरिकांनो रहा सावध : बनावट कागदपत्रे बनवून गरिबांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली गरिबांची करतात लूट

2 0 8 9 8 8

किशोर कारंजेकर

वर्धा : वर्धा जिल्ह्यात मागील एक ते दिड वर्षांपासून जी. एस. फायनास व शुभ-लाभ फायनान्स कंपनीचे संचालक कमलेश धोटे व गजानन सातव हे राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व ग्राहकांचे खोटे शासकीय सेवेचे ओळखपत्र बनवून त्या कागदपत्राच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून ५ लाखांपासून ते २०-२५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देतात. ज्यातून हे दोन्ही महाठग व त्यांचे सहकारी हे ग्राहकांकडून कमिशनच्या नावाखाली ३०% ते त्यापेक्षा ही जास्त रक्कम हडपतात. गरीब ग्राहकांना याची कल्पना नसल्याने हे यांच्या ठगखोरीला बळी पडतात व अवाढव्य मासिक हप्ते भरण्यास ग्राहक असक्षम ठरल्याने नाहीलाजास्तव त्यांना बँकेच्या हेकेखोरीच्या व दडपशाहीला कंटाळून मासिक हप्ते भरत आहेत. कर्जपुरवठयातुन अर्धी अधिक रक्कम हडपणारे हे महाठग ग्राहकांना भुरळ पाडून करोडोंची मालमत्ता जमविण्यास व्यस्त आहेत. जिल्ह्यातील कित्येक सामान्य नागरिक या महाठग यांच्या विळख्यात सापडून आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याने या महाठग असलेल्या कमलेश धोटे व गजानन सातव यांना धडा शिकवणे आता गरजेचे झाले आहेत. म्हणूनच आता फसवणूक झालेले सर्वच एकत्रित येत तक्रारी दाखल होत आहे.

या महाठग व्यक्तींना सहकार्य करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांचे चेहरे सुद्धा समोर येणे आता गरजेचे झाले आहे.

यापुढे जिल्ह्यातील कुठल्याही सामान्य नागरिकांना या महाठग कमलेश धोटे व गजानन सातव यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये. यांच्या जाळ्यात अडकणाऱ्या सामान्य नागरिकांनी RNN न्यूज चॅन सोबत संपर्क साधावा व जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनी या महाठग असलेल्या कमलेश धोटे व गजानन सातव यांच्यापासून सावध राहावे..!!!

पुढील भागात : ऍक्सिस बँक, एस बँक, IDBI बँकेच्या कर्मचाऱ्यांचा आणि कमलेश धोटे, गजानन सातव यांचा समंध जोडणारा…. अनंता (अमरावती)

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे