ब्रेकिंग
महर्षी विद्या मंदिरात गुरू पौर्णिमा उत्सव साजरा
2
6
6
6
6
0
किशोर कारंजेकर
वर्धा : – महर्षी महेश योगी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सेलू काटे येथील महर्षी विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा हा ‘जीवनातील परिपूर्णतेचा उत्सव’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती जयश्री गफाट प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी विशेष अतिथी चेतना मिलिंद कांबळे भाजपा महिला सचिव, प्राचार्या स्वाती लोणकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्या स्वाती लोणकर यांनी महर्षीजींनी भारतीय वैदिक ज्ञानाची जागतिक स्तरावर स्थापना केल्याबद्दलची माहिती प्रास्ताविकातून दिली. यासोबतच उपस्थित पाहुण्यांनी देखील यावेळी समायोचित मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन स्वाती लोणकर यांनी केले. कार्यक्रमाला महर्षीजींनी प्रेरित केलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2
6
6
6
6
0