Breaking
ब्रेकिंग

वैद्यकीय अधिकारी दोषारोपातून निर्दोष मुक्त, आरोग्य विभागाच्या अवर सचिवाचे आदेश, आठ वर्षांपूर्वीची घटना, शिवसेना जिल्हाप्रमुखाची तक्रार

1 9 7 0 5 5

राजयोग न्युज नेटवर्क

कारंजा (घा) : – येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शकील अहमद यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या तक्रारीवरून आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची येथून तात्काळ बदली करीत विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याबाबत शासनाच्या वतीने नुकताच अंतिम आदेश निर्गमित करण्यात आला असून त्यात डॉ. शकील अहमद यांची दोषारोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आठ वर्षांपूर्वी येथे कार्यरत असलेले प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शकील अहमद हे त्यांचा खाजगी दवाखाना सुद्धा चालवत होते. त्यावेळी तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी ते अनधिकृतपणे खाजगी व्यवसाय करतात, रुग्णालयात उपलब्ध दाखल्यासाठी शुल्क आकारून पदाचा दुरुपयोग करतात, अश्या प्रकारचा ठपका ठेवत त्यांच्या खाजगी दवाखाण्यास कुलूप लावले होते. आरोग्य विभागाने तात्काळ यासंबंधीच्या तक्रारीची दखल घेत डॉ. शकील यांची येथून बदली केली, तसेच कारवाई करीत त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर डॉ. शकील यांनी शासनास बचावाचे अभिवेदन सादर केले होते. त्यानुसार दोषारोपाची चौकशी करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार त्यांच्या विरुद्ध बजावण्यात आलेले दोषारोप सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता. यासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे अवर सचिव अनिल सावरे यांची स्वाक्षरी असलेला अंतिम आदेश नुकताच निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शकील अहमद यांची दोषारोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ते येथील ग्रामीण रुग्णालयात सलग बारा वर्षे कार्यरत होते हे विशेष..

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे