Breaking
ब्रेकिंग

पत्रकार दिनी देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी भारत घवघवे सन्मानित

1 9 7 0 4 1

सचिन धानकुटे

सेलू : – पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात येथील देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी भारत घवघवे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. 

   वर्ध्याच्या बजाज सार्वजनिक वाचनालयात शनिवारी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी देशोन्नतीचे सेलू तालुका प्रतिनिधी भारत घवघवे यांचा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच पत्रकार संरक्षण समितीचे सेलू तालुका अध्यक्ष गजानन जिकार यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, जिल्हाध्यक्ष शशांक चतारे, संदीप रघाटाटे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. राजू गोरडे, रविराज घुमे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

      सेलू तालुक्यातील पत्रकार बंधूंनी याबद्दल भारत घवघवे यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे