Breaking
ब्रेकिंग

मोटारसायकलच्या धडकेत सायकलस्वार ठार : तळेगांव-आष्टी रस्त्यावरील देवगांव शिवारातील घटना

2 6 7 9 5 5

किशोर कारंजेकर

वर्धा : – भरधाव माेटरसायकलने सायकलला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तळेगांव-आष्टी रस्त्यावरील देवगांव शिवारात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

सुधाकर रामभाऊ शेटे(वय६५) रा. तळेगांव(शा.पं.) असे मृतक सायकलस्वाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक सुधाकर हा सायकलने तळेगांव येथून त्यांच्या देवगांव शिवारातील शेतात वासरांकरीता कुटार आणण्याकरीता जात होता. दरम्यान एम एच २७ बीएच ४३३७ क्रमांकाची माेटारसायकल आष्टीकडुन तळेगांवकडे येत होती. सदर माेटारसायकलने सुधाकरच्या सायकलला देवगांव शिवारात जबर धडक दिली. यात सुधाकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तळेगांव पाेलिसांनी मोटारसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, नितेश वाघमारे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 7 9 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे