खंडणीतून घेतलेल्या नव्या गाडीने संस्था हडप्या गजुचा आज कॉलेजात प्रवेश

किशोर कारंजेकर
वर्धा : आमच्या चॅनलने डॉ. गजू खोटेवार यांच्या खंडणीबाज सत्काराचे किस्से उघड करताच नवनवी माहिती पुढे येत आहे. त्याच्या संस्थेतील शिक्षक प्राध्यापक व आता विद्यार्थी पण गजू यांच्या सत्कार किस्से चघळत आहेत.
एका बेरोजगार युवकाने संस्थेत प्राध्यापकची जागा निघणार असल्याचं ऐकून गजू हडप्याकडे धाव घेतली. ५५ लाखात सौदा झाला. त्यातले काही गजूने ऍडव्हान्स मागितले. ही रक्कम त्याने नवी कार बुक करण्यात वापरली. सत्कार खंडणीतून उरलेले पैसे टाकत गज्याने गाडी विकत आणली. कालचा सत्कार फेल गेला. तरी निर्लज्ज असा हडप्या त्याच गाडीने संस्थेत आला व प्रिन्सिपॉलच्या खुर्चीत बसला. आज त्याने परत खंडणी गोळा करीत सत्कार ठेवला आहे. जिथे सत्कार आहे ती संस्था हडपण्याचा संकल्प त्याने त्याचा पिलांटू अमृत यांच्याकडे बोलून दाखविला आहे.
हडप्या आहेच तसा. वर्धेतील संस्था हडपल्यानंतर त्याने सालोडची संस्था हडपली होती. मात्र तिथे खासबागे यांनी त्याची डाळ शिजू दिली नाही. पुढे ग्रंथालय संघातील साध्या सरळ पदाधिकाऱ्यांना वाटेला लावत हा संघ बळकविला. आता बजाज ग्रंथालय ताब्यात घेण्याचे मनसुबे गजू खोटे ठेवून आहेत. आजच्या सत्कार ग्रामीण ग्रंथालयाचा गरीब कर्मचाऱ्यांनी पाचशे पाचशे रुपये जमा करीत आयोजित केला. गजूने कपडे व भेटवस्तू सोबतच सातशे रुपयाचा केक आणायला सांगितल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. ते दिसेलच. गजु हे बरे नव्हे रे, एवढेच सांगणे.