Breaking
ब्रेकिंग

बुलढाणा अर्बनच्या गोदामावर दंडात्मक कारवाईचा बडगा ; विस वर्षापासून परवानगीचं नसल्याची बाब उजेडात

2 6 6 6 5 8

सचिन धानकुटे

सेलू : – येथील बुलढाणा अर्बनच्या गोदामाला परवानगीचं नसल्याने त्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ही कारवाई महसूल विभागाच्या वतीने करण्यात आली असून गेल्या विस वर्षांपासून अनधिकृतपणे सदर गोदाम कार्यान्वित असल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सेलू शाखेचे सुकळी रस्त्यावर वेअर हाऊस (गोदाम) आहे. सदर गोदाम गेल्या विस वर्षांपासून म्हणजेच सन २००४ पासून येथे कार्यान्वित असल्याचे सांगितले जाते. या विस वर्षाच्या काळात सदर गोदामाला परवानगीचं नसल्याची बाब नुकतीच उजेडात आली. यासंदर्भात महसूल विभागाच्या वतीने संबधितांना नोटीस देखील बजावण्यात आली आणि एक लाख रुपयांपेक्षाही जास्तीचा दंड देखील ठोठावण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी दिली. यासंदर्भात येथील बँकेचे व्यवस्थापक जोशी यांनी याप्रकरणी ठोठावण्यात आलेला दंड भरण्यात आला, परंतु अद्यापही गोदामासाठी लागणारी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले.
एरव्ही एखाद्या गोरगरिबाने जर शंभर-दोनशे रुपयांचा टॅक्स भरला नाही, तर त्यांच्या नळजोडण्या कापल्या जातात, नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे दिली जात नाही, परंतु विस-विस वर्षांपासून परवानगी न घेताच अनधिकृतपणे गोदाम उभारली जात असल्याने “आंधळं दळतयं अन् कुत्रं पिठ खातयं” असाच काहीसा प्रकार येथे पहायला मिळत आहे.
सदर बुलढाणा अर्बनचेचं शहराबाहेरील नागपूर रस्त्यावर देखील नव्यानेच एक प्रशस्त असे गोदाम उभारण्यात आले. त्याठिकाणी देखील अकृषक न करताच बांधकाम करण्यात आले. यासंदर्भात जेव्हा नोटीस निघाल्यात तेव्हा कुठे बँक व्यवस्थापन खडबडून जागे झाले आणि त्यांनी याकरिता पाऊले उचललीत. शहरात अश्याप्रकारे अनेक ठिकाणी अकृषक न करताच मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. याकडे देखील संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष वेधतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे