ब्रेकिंग
धानोलीच्या ऑक्सिजन पार्कजवळ वृक्षांची लागवड
2
6
7
9
6
3
सचिन धानकुटे
सेलू : – धानोली (मेघे) येथील ऑक्सिजन पार्क नजीकच्या सेलू-धानोली-कोटंबा या रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या वतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक तीन अंतर्गत शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच जयश्री शंकदरवार, माजी सरपंच प्रफुल्ल लुंगे, अभियंता विकास डेकाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पिपरी(मेघे) येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी तसेच मनीष शर्मा, पंकज शर्मा आणि गावकरी उपस्थित होते.
धानोली(मेघे) येथे दोन एकरातील हिरव्या कंच ऑक्सिजन पार्क नजीक ही वृक्ष लागवड झाल्याने रस्त्याच्या व परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. याप्रसंगी वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
2
6
7
9
6
3