श्री क्षेत्र चौकी येथील बॄहस्पती मंदिरात गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर संगीतमय रामकथा
सचिन धानकुटे
सेलू : – श्री क्षेत्र चौकी येथील बॄहस्पती मंदिरात आषाढातील गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुवार ता.११ पासून रविवार ता.२१ जुलै पर्यंत संगीतमय रामकथा आयोजित करण्यात आली आहे.
कान्होलीबारा नजिकच्या श्री क्षेत्र चौकी येथील बॄहस्पती मंदिरात आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर पंचकुंडीय श्रीराम महायज्ञासह संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथील आंतरराष्ट्रीय रामकथा प्रवक्ता श्री राममोहनदासजी रामायणी आपल्या ओजस्वी वाणीतून रामकथा सांगत आहेत. त्यांना आचार्य सुदर्शन दास महाराज हे साथ देत आहेत. याप्रसंगी कलश यात्रा, अभिषेक आणि वेदपाठ, श्रीराम महायज्ञ, संगीतमय रामकथा, यज्ञाची पूर्णाहुती तसेच रविवार ता.२१ रोजी मोहाडी आळंदी येथील हभप श्री कुंभ महाराज किरपान यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सदर रामकथेचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजक ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.