Breaking
ब्रेकिंग

बोर व्याघ्र प्रकल्पात उंदराला मांजर साक्ष..! वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचं दिवाळं काढून उपसंचालकाची दिवाळी..!!

2 6 9 2 0 6

सचिन धानकुटे

सेलू : – बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांनी अगदी दिवाळीच्या तोंडावर अधिनस्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचं दिवाळं काढत स्वतःची दिवाळी साजरी करण्याचा बेत आखल्याच्या चर्चांना सध्या तालुक्यात उधाण आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी स्वतःची तुंबडी भरण्यासाठी सध्या वसूलीचा एककलमी कार्यक्रम राबविला आहे, त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पात नेमकं चाललं तरी काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोयं.

            राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला असून सध्या दिवाळी देखील अगदी तोंडावर आहे. अशावेळी बोर व्याघ्र प्रकल्पात मात्र भलतंच काहीतरी घडत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. बोर व्याघ्र प्रकल्पातील ओल्ड आणि न्यू बोर अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून उपसंचालक महोदयांनी हप्तावसूली करीत चक्क आपली दिवाळी साजरी करण्याचा बेत आखल्याचा धक्कादायक खुलासा केल्याने मोठी खळबळ उडाली. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वर्ध्यातील “त्या” अधिकाऱ्याने दिवाळीच्या नावाखाली येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून जोरात वसूली केली. दरम्यान येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचं मात्र सदर प्रकारामुळे पार दिवाळं निघालं आहे. याचा कबूली जबाब दस्तुरखुद्द वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनीच शुक्रवारी दिला.

     आपल्याच अधिनस्त कर्मचाऱ्यांचं दिवाळं काढून स्वतः दिवाळी साजरी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी “मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली” अशा आविर्भावात यावेळी आपले हात झटकलेत. त्यामुळे वन विभागाच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांवर दिवाळीच्या तोंडावर ही वेळ का व कोणी आणली, यासंदर्भात सध्या तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

     बोर व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी सध्या वर्ध्यातील तथाकथित चांडाळ चौकडीच्या तालावर नाचत असल्याचा प्रत्यय याआधी देखील तालुक्यातील जनतेला आला होता. वन आणि वन्यजीव जरी सेलू तालुक्यात असले, तरी कारभार मात्र वर्ध्यातील चांडाळ चौकडीच्या इशाऱ्यावर होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 2 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे