Breaking
ब्रेकिंग

देवळीच्या देशमुख पुऱ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्डयावर धाड ; १५ जणांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

2 2 5 4 7 2

सचिन धानकुटे

वर्धा : – देवळी शहरातील देशमुख पुऱ्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्डयावर आज पोलिसांनी धाड टाकत जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक केली. या कारवाईत एका कारसह १६ मोबाईल व ३ लाखांची रोख रक्कम असा एकूण १० लाख ६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

     देवळी शहरातील देशमुख पुऱ्यातील मिलिंद देशमुख यांच्या घरात हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरू असल्याची भनक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास लागली होती. त्यानुसार त्यांनी आज बुधवारला त्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे ५२ पत्यावर अवैधपणे जुगाराचा डाव सुरू होता. पोलिसांनी या कारवाईत १५ जणांना ताब्यात घेतले. यात मिलिंद मधुकर देशमुख(वय४५) रा. देवळी, शाहरुख खान मेमनखान पठाण(वय३०) रा. शिवनगर वर्धा, नितेश भाष्कर राखडे(वय३३) रा. अशोकनगर वर्धा, किरण अशोक कोल्हे(वय२१) रा. रामनगर वर्धा, शेख आसिफ शेख मेहबूब(वय४०) रा. फुलफैल वर्धा, योगेश रामकृष्ण झाडे(वय३६) रा. सेलू घोराड, विक्की अशोक श्रीरामे(वय३२) रा. सिंदी(मेघे) वर्धा, विशाल अर्जुन सोयाम(वय२८) रा. इंदिरा नगर वर्धा, अल्केश शंकर फुलझेले(वय३४) रा. पंचशीलनगर पुलगांव, चिन्मय भिमराव पुसदकर(वय२१) रा. नाचणगांव, यश अशोक चौधरी(वय२७) रा. पुलगांव, परमजितसिंग गुरुदेवसिंग बोपरथ(वय२७) रा. पालीवाल नगर बुट्टीबोरी, गुरुसेवक जसवंतसिंह उप्पल(वय३१) रा. पालीवाल नगर बुट्टीबोरी, शेखर नारायण वानखेडे(वय४४) रा. देवळी, विक्की किशोरराव पाटणकर(वय३२) रा. देवळी अशा एकूण पंधरा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५२ पत्ते, ३ लाख ५ हजार ९३० रुपयांची रोख रक्कम, दोन लाख ७०० रुपयांचे १६ मोबाईल,एम एच ३१ एफयू ३६३२ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर असा एकूण १० लाख ६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्यावर देवळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.   

     ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात एपीआय संदीप गाढे, रोशन निंबाळकर, सागर भोसले, अभिजित गावंडे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, वाहनचालक प्रशांत आमनेरकर आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

4/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 4 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे