Breaking
ब्रेकिंग

युवा संघर्ष यात्रा तरुणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणार : समीर देशमुख : युवा संघर्ष यात्रा 6 डिसें ला पुलगावात

1 9 7 0 9 5

वर्धा : राज्यातील तरुण, बेरोजगार युवक तथा शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहीत पवार यांनी पुणे ते नागपूर पायदळ ‘युवा संघर्ष यात्रा’ सुरु केली आहे. नागपूपर्यंत काढल्या जाणाऱ्या या यात्रेचा आरंभ मंगळवार दि. 24 ऑक्टोबर ला शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला.

दि. 6 डिसेंबर 2023 ला या यात्रेचे पुलगाव येथे आगमन होणार असून धोत्रा, सालोड, वर्धा, सेवाग्राम, पवनार, सेलू, हिंगणी या मार्गाने दि. 8 डिसेंबर 2023 ला नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तीन दिवस ही यात्रा वर्धा जिल्हात राहणार असून या संदर्भात दि. 16 नोव्हेंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, वर्धा येथे समीर देशमुख यांनी बैठक आयोजित केली होती. बैठकीत युवा संघर्ष यात्रे संदर्भात नियोजन करण्यात आल्याची माहिती समीर देशमुख यांनी दिली. तर ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याची माजी आमदार राजु तिमांडे नी सांगितले. बैठकीला आफताब खान, पंकज घोडमारे, संदीप किटे, प्रा. खलील खतीब, मिलिंद हिवलेकर, संदीप भांडवलकर, धनराज तेलंग, नावेद शेख, प्रशांत कुत्तरमारे, विनोद पांडे, गणेश कामनापुरे, अर्चीत निघडे, राहुल घोडे, संजय काकडे, प्रणय कदम, हरीश काळे, रामु पवार, नरेश खोडके, रवी संगतानी, सचिन ठाकरे, संकेत तळवेकर, रोशन राऊत, प्रज्वल धंदरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे