शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला 12 तास विद्युत पुरवठा द्या, अन्यथा विद्युत कार्यालयाला टाळे ठोकू : अतुल वांदिले यांचा परिवर्तन यात्रेमधून इशारा
हिंगणघाट :- हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना येथील रुद्रेश्वराच्या मंदिरातून माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख ,जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अतुल वांदीले या नेतृत्वामध्ये सुरु झाली असून ही यात्रा २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत अविरत सुरू राहणार आहे.मागील सहा दिवसामध्ये या यात्रेने चाळीस गावाला भेट दिल्या आहे.
परिवर्तन जनसंवाद यात्रेमध्ये फिरत असताना मागील सहा दिवसात पोहना, शेकापूर(बाई), पिपरी, वडणेर, बुरकोनी, फुकटा सर्कल मधील चाळीस गावामध्ये भेटी झाल्या असून मुख्यतवे शेतकरी,मजूरवर्ग ,युवावर्ग याच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा संकल्प या यात्रेतून होत आहे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला दिवसा लाईन नसल्यामुळे आम्हाला रात्री शेत ओलित करण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते. जर आम्हाला साप चावला किंवा जंगली प्राण्यांनी हल्ला केला तर यांचा जबाबदार कोण राहणार आमच्यावर वाईट परिस्थिती आली आहे. त्यामुळे आमचे कुटुंब रस्त्यावर येऊ शकते अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र अतुल वांदिले यांना सांगितली. ही परिस्थिती अतुलभाऊ यांनी ऐकताच आपल्या शेतकरी बापाची किती वाईट परिस्थिती आहे आम्ही शेतकऱ्याची मुलं राहून काय फायदा जर आमच्या बापाला धक्का लागणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही यासाठी म्हणून शेतकऱ्यांचा कृषी पंपाला जर तुम्ही सातही दिवस दिवसाला १२ तास वीज द्या जर १२ तास वीज दिल्या गेली नाही तर आम्ही विद्युत कार्यालयाला टाळे ठोकून कार्यालय चालू ठेवू देणार नाही ही आक्रमक भूमिका घेण्यात येईल अशा इशारा अतुल वांदिले यांनी दिला आहे.शेतकत्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणी तरी आपल्यापर्यत येत आहे आपल्या घरपर्यत पोहचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी मोठया उत्साहाने ,आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी स्वंयप्रेरणेने या परिवर्तन यात्रेमध्ये सहभागी होत आहे .