ब्रेकिंग
वाघाने केले शेतकऱ्याला फस्त : आष्टी तालुक्यातील धाडी येथील घटना
2
6
6
6
1
5
आष्टी : काल सकाळी शेतात गेलेला शेतकरी रात्री घरी परत न आल्याने कुटुंबियांसह २० ते २५ लोकांनी शोध घेतला असता आज १ रोजी सकाळी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 28 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील धाडी येथील वामन मडावी (52) हे शेतात गेले होते. रात्र होऊनही घरी आले नाही म्हणून त्यांच्या मुलांनी व गावकऱ्यातील 20 ते 25 लोकांनी रात्रभर शेत शिवारामध्ये पाहणी केली. पण, ते आडळून आले नाही. दरम्यान, आज सकाळी धाडी शेत शिवारामध्ये त्यांना अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची वन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
2
6
6
6
1
5