Breaking
ब्रेकिंग

नागपंचमी निमित्त युवकांचे रक्तदान, न्यु बजरंग ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम

2 6 6 6 2 7

सचिन धानकुटे

सेलू : – नजिकच्या वडगांव खुर्द येथील न्यु बजरंग ग्रामीण विकास संस्थेच्या युवकांनी आज रक्तदान करीत नागपंचमी साजरी केली. यावेळी २५ युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

      वडगांव खुर्द येथील न्यु बजरंग ग्रामीण विकास संस्था व सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या वतीने आज नागपंचमीच्या औचित्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित या शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी न्यु बजरंग ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण सावरकर, उपाध्यक्ष राहुल कबांले, सचिव राहुल सावरकर, सागर किरमे,मनोज राऊत, प्रदीप भंlडेकर, सुभाष येलोरे, समीर सायरे, सूरज सातपुते, प्रदीप नरताम, मुकुल राऊत, विलास सावरकर, शशिकांत सावरकर, शुभम मुड़े, कुणाल भटेरो, निखिल नरताम,भूषण लटारे, विक्रांत उईके, पंकज निमजे, गौरव धानकुटे आदि पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे