Breaking
ब्रेकिंग

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दादांच्या युवा कार्यकर्त्यांचा खेला..! काँग्रेसच्या एका खेम्यातून दाखल होणार दुसऱ्या खेम्यात

2 6 8 5 6 8

किशोर कारंजेकर

वर्धा : – निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी दाखल झालेल्या अभ्युदय मेघे म्हणजे अर्थात दादांना त्यांच्या सेलू तालुक्यातील युवा सहकाऱ्यांनी धक्का देत खेला करण्याची भावना व्यक्त होत असल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेसकडून अभ्युदय मेघे यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात असतानाच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना टाटा बाय बाय करीत दुसऱ्या संभाव्य उमेदवाराचा झेंडा हातात घेणार असल्याच्या चर्चांना आता चांगलेच उधाण आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकप्रकारे खळबळ उडाल्याचे दिसून येते.

      अभ्युदय मेघे गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्याच्या राजकारणात अचानकपणे सक्रिय झालेत आणि त्यांनी सेलू तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. सेलू तालुक्यात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी देखील उभी केली. दादांनी आपल्या त्या सहकाऱ्यांना सोबत घेऊनच तालुक्यातील प्रत्येक गावात मोर्चेबांधणी केली. निवडणुकीच्या आधी प्रत्येक गाव पिंजून काढले. दरम्यान दादांचा काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी पक्षप्रवेश झाला आणि त्यांचे फासे उलटे पडायला सुरुवात झाली.

ज्या सहकाऱ्यांच्या जोरावर ते आमदारकीचे मैदान मारण्याचे स्वप्न बघत होते, त्यांच्यात आणि दादांच्यात येत्या काळात खटके उडायला लागले. त्यामुळे दादांच्या कार्यकर्त्यांसह सहकाऱ्यांच्या मनात आधीच्या व नंतरच्या भुमिका बद्दल संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली. त्याचाच परिपाक म्हणून आता दादांच्या युवा सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या या खेम्यातून दुसऱ्या खेम्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेयं. अशा प्रकारच्या चर्चांना सध्या मोठ्या प्रमाणात ऊत आला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेला हा “खेला” राजकीय पंडितांच्या भुवया उंचावणारा ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 5 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे