साने गुरुजींच्या नावाने पैसा गुरुजी झालेल्या गज्या खोटेवार (डोम्यानाग)च्या स्कुटरमध्ये मिळाला होता देशीकट्टा : गज्याच्या अनुभवात आहे पोलीस कोठडीतील “हवा”

किशोर कारंजेकर
वर्धा : संस्था हडप्या गजानन खोटेवार यांच्या प्राध्यापकिचे आणि त्यांनी उधळलेल्या गुणाचे इरसाल किससे किस्से हाती आले आहेत. खादीच्या वस्त्रात वावरणारा हा महाभाग कधीकाळी देशी कट्टा बाळगत होता, यावर विश्वास बसणार नाही.
सध्या नव्या कोऱ्या कारमध्ये फिरणारा त्यावेळी हिरव्या रंगाच्या स्कुटरने फिरत होता. त्याच्या स्कूटरच्या डिक्कीतून कट्टा ही जप्त केला होता. त्यामुळे नऊ गज असलेल्या कारागृहात पोलीस कोठडीत रात्रही काढावी लागली होती. त्यावेळी त्याने “तो मी नव्हेच” अशी भूमिका घेतली होती.
स्कूटरच्या डिक्कीत हा देशी कट्टा कसा आला होता. याचा शोध न घेतलेलाच बरा. प्राध्यापकी सोडल्यानंतर गज्याची वक्रदृष्टी लोक महाविद्यालयावर पडली आणि हेमके गुरुजीचा विश्वास संपादन करून आणि नंतर त्यांचाच विश्वासघात करित संस्थाच हडप केली. ही संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सेवक आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक आष्टी येथील श्यामराव दादा मोकदम यांच्यासारख्या तपस्विनींनी उदात्त हेतूने जनकल्यानाच्या भावनेत स्थापन केली होती. पण खोटेवारने त्यांच्या हयातीतच कारस्थान करून त्यांना बाजूला सारले. पुढचा क्रमांक हेमके गुरुजींचा लागला.
आणि आता हा “डोम्या नाग” संस्थेवर वेटोळे मारून पाहिजे त्याला “स्वार्थदंश” करू लागला आहे. गज्याच्या कारभाराने आणि पैसा लोलूपतेने सगळेच चकित झाले आहेत.
साने गुरुजींच्या नावाने कधी काळी प्रचारयात्रा काढणारा गज्या गुरुजी पैसे गुरुजी झाला. स्कुटर ते मारुती व्हॅन नंतर आलिशान गाडी ही कमाई कशी वाढली याचा शोध RNN घेणारच आहे.
पुढील भागात : गज्या खोटेवार आणि प्राचार्य राज्या जाधवराव चोटेवार याच्या बोगस PHD चा लफडा..