Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक..! छताचा पंखा अंगावर पडल्याने गवंडी कामगाराचा मृत्यू, दालमीलच्या बांधकामा दरम्यान घडली घटना

2 4 7 1 8 2

सचिन धानकुटे

सेलू : – झोपून असलेल्या गवंडी कामगाराच्या अंगावर छताचा पंखा पडल्याने करंट लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना तालुक्यातील शिवनगर ते जुनोना रस्त्यावरील नवनिर्माणाधीन दालमीलमध्ये घडली. मोरेश्वर उत्तमराव ढोबळे (वय४०) रा. पिपरी (मेघे) असे मॄतक गवंडी कामगाराचे नाव आहे.

     तालुक्यातील शिवनगर ते जुनोना रस्त्यावर एका बचत गटाच्या दालमीलचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी मॄतक हा कामाला होता. कामाच्या ठिकाणीच तो मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुक्कामाला होता. यावेळी तो ज्याठिकाणी झोपला होता, त्याठिकाणी लाकडी दांड्याला एक छताचा पंखा लावण्यात आला होता. तो पंखा अचानक खाली पडला आणि वीज प्रवाहीत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना काल बुधवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मॄतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी दहेगांव पोलिसांत तक्रारीहून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास दहेगांव पोलीस करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे