ब्रेकिंग
अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
2
6
6
6
0
9
सचिन धानकुटे
वर्धा : – पोलिसांनी अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई करीत जवळपास १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेती घाटावर शुक्रवारी केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांना आंजी येथील गजानन देवराव परसराम, रवी कांबळे, नाना नामक चालक व स्वपनिल बाबाराव भोयर हे क्रमांक नसलेल्या हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरमधून एक ब्रास वाळू विना परवाना वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत ट्रॅक्टरसह दोन ट्राली व एक ब्रास वाळू असा एकूण १३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.
2
6
6
6
0
9