Breaking
ब्रेकिंग

कुत्र्यांचा अडथळा अन् दुचाकीस्वारांची पंचाईत..! भुईसपाट झाल्याने जावई आणि सासरा जखमी

2 2 5 4 1 6

सचिन धानकुटे

सेलू : – धावत्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने जावई अन् सासरा असे दोघेही जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास रेहकी रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर घडली. जखमी दोघांनाही उपचारासाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

       रेहकी येथील सुधाकर बिसेन (वय३३) व त्यांचे सासरे नंदलाल ठाकरे (वय५०) असे दोघेही एम एच ३२ क्यू ३४३८ क्रमांकाच्या दुचाकीने सेलू येथून रेहकीच्या दिशेने जात होते. दरम्यान रेहकी रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा धावत आल्याने दोघेही रस्त्यावर खाली पडलेत. ही घटना काल शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यात सुधाकरच्या हात आणि पायाला तर त्याचे सासरे नंदलाल यांच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. घटनेनंतर दोघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

      सदर परिसरात मोठ्या प्रमाणात सातत्याने काही खाजगी तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. याआधीही ह्याच कुत्र्यांमुळे सध्याच्या एका नगरसेवकाला तसेच एका उद्योगपती यांना आपले हातपाय मोडून घ्यावे लागले होते. येथील कुत्रे अचानक धावत्या वाहनासमोर येत असल्याने नेहमीच किरकोळ स्वरुपाचे अपघात सातत्याने घडतात. त्यामुळे हौसेखातर आपले कुत्रे रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्यांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत देखील शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. परंतु त्यावेळी बहुतांश लोकप्रतिनिधींनी सदर विषय हसण्यावारी नेला. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरचं संबधितांना जाग येणार का..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे