यापुढे तुमच्या निरोगी शरीराची हमी घेणार “आपला दवाखाना” : आजच्या उपक्रमात 47 जणांची तपासणी आणि मोफत औषधी वाटप
किशोर कारंजेकर
वर्धा : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांनी “आपला दवाखाना” या नावाने ठाणे येथून सुरु केलेला दवाखाना आज वर्ध्यातही आपली सेवा देण्यात मागे नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारीपासून प्रारंभित झालेला हा दवाखाना वर्धेकरांना निरोगी ठेवण्याकरिता सज्ज झाला आहे.
आज ता. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त नालवाडी येथील गलांडे यांच्या घरी सुरु करण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अभय मोहिते आणि डॉ. शुभम तळवेकर यांनी तब्बल चार तास सेवा देत सुमारे 47 रुग्णांची नि:शुल्क तपासणी केली. याचवेळी सर्वांना मोफत औषधी सुद्धा देण्यात आली.
वंदना किशोर बोकडे यांच्या पुढाकारातून हा आपला दवाखाना सुरु केला असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात हा दवाखाना सेवा देत राहील, असा विश्वास वंदना बोकडे यांनी व्यक्त केला.
आपला दवाखाना उपक्रमात आरोही सयाम, वैष्णवी मडावी, चंद्रकला उईके, रंजना पोहूरकर, माला फलके, प्रमिला मोरे, आशा तुराढे, मधू वाघाडे, कुमुद मडावी, नेहा वरघणे, आशा वाघमारे, लक्ष्मी बोबडे, प्रिया बडवाईक, दिव्या बडवाईक यांचेही सहकार्य होते.