Breaking
ब्रेकिंग

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ देशातील नंबर एक पत्रकार संघटना‘ : आनंदीमय’ कार्यक्रमात मंत्री लोढा, पाटील, शर्मा, पात्रुडकर, तुपकर, महाजन यांनी व्यक्त केल्या भावना..! : पुपाला, जोरे यांनी स्वीकारले ‘इंडिया बुक रेकार्ड’चे मानचिन्ह

2 5 4 4 4 6

मुंबई (प्रतिनिधी) : अवघ्या तीन वर्षांत देशातील ३७ हजार सहाशे पत्रकारांना आपल्या पत्रकारितेच्या प्रवाहात सदस्य,पदाधिकारी म्हणून समाविष्ट करून घेतलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’या पत्रकारांची संघटना, संस्थेला आता देशातील नंबर एक संस्था, संघटना म्हणून मान्यता मिळालेली आहे. हेच औचित्य साधून मुंबईमध्ये आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांनी देशभरातून हजेरी लावली होती. 

एका छप्पन वर्षीय पत्रकारांच्या, संस्था, संघटनेचे सर्वाधिक सदस्य नोंदणी असलेले रेकॉर्ड तोडत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटना, संस्थेने देशातली नंबर वन म्हणून स्थान मिळवले आहे. आज ‘इंडिया बुक रेकॉर्ड’ने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला नंबर वन पत्रकारांची संस्था, संघटना म्हणून सन्मानित केले. या निमित्ताने मुंबईत हॉटेल सम्राटच्या ‘उमंग’ सभागृहात एका ‘आनंदीमय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘इंडिया बुक रेकॉर्ड’ने दिलेल्या प्रमाणपत्राचं, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ नंबर वन लोगोचे विमोचन करण्यात आले. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चा मुख्य चेहरा असणाऱ्या चंद्रमोहन पुप्पाला, धर्मेंद्र जोरे या दोघांनी इंडिया बुक रेकॉर्डचं मानचिन्ह स्वीकारले. आता ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ३७ हजार ६०० पत्रकार सदस्य असलेली संघटना झाली आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मंगल प्रभात लोढा (पर्यटन मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय) खा. हेमंत पाटील (खासदार हिंगोली लोकसभा), मनोजकुमार शर्मा (वरिष्ठ आय. पी. एस. अधिकारी), विनायक पात्रुडकर (ज्येष्ठ संपादक तथा मुख्यमंत्री यांचे माध्यम सचिव), रविकांत तुपकर (नेते शेतकरी संघटना), डॉ. प्रदीप महाजन (ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ञ), संदीप काळे (संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ‘व्हॉइस ऑफ मीडिया’), चंद्रमोहन पुपाला (राष्ट्रीय सरचिटणीस ‘व्हॉइस ऑफ मीडिया’), धर्मेंद्र जोरे (राष्ट्रीय उपाध्यक्ष ‘व्हॉइस ऑफ मीडिया’), अनिल म्हस्के ( महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ‘व्हॉइस ऑफ मीडिया’) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी भाषणे यावेळी झाली. या कार्यक्रमासाठी देशातून प्रमुख असणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ च्या पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे