परिवर्तन जनसवांद यात्रेमुळे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात २०२४ ला नक्कीच परिवर्तन होणार : माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून २२ दिवसात २२२ गावांना अतुल वांदिले यांनी भेट देऊन नागरिकांशी साधला संवाद
हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसंवाद यात्रेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी झाली असून या यात्रेच्या २२ व्या दिवशी कांढळी येथे माजी राज्यमंत्री तथा माजी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित राहत परिवर्तन जनसंवाद यात्रे मध्ये सहभागी झाले.
परिवर्तन जनसंवाद यात्रेमुळे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात २०२४ ला नक्कीच परिवर्तन होणार असे मनोगत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.पुढे बोलत असताना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केलेले आंदोलनातून अनेक प्रश्नाना वाचा फोडली आहे.शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवकांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहे आणि त्यातून त्याना न्याय देखील मिळाला आहे. परिवर्तन जनसंवाद यात्रेमुळे २०२४ ला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन होणार असे मनोगत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोकजी वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, महादेव वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,राजेश धोटे, कांढळी सरपंच संध्याताई मडावी, ग्रामपंचायत सदस्य इंदिराताई अवचट,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, सुभाष चौधरी,दिव्यांग सेल मारोती महाकाळकर,किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष किशोर चांभारे,आदिवासी जिल्हाध्यक्ष संदीप उईके,सिंदी शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर,राजू मेसेकर,बंढुजी लोणकर, सुधाकर वाढई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यासभेचे आयोजन महादेव वांदिले,अनिकेत अवचट, अविनाश वांदिले यांनी केले होते…