Breaking
ब्रेकिंग

सेलूत १८ लाखांच्या विकास कामांचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते भूमीपूजन : दोन प्रभागासाठी विविध विकास कामे प्रस्तावित

2 0 3 7 5 0

सचिन धानकुटे

सेलू : – शहरातील प्रभाग क्रमांक ६ आणि १७ अशा दोन प्रभागासाठी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांच्या विशेष प्रयत्नातून विविध प्रकारची विकास कामे सध्या प्रस्तावित आहेत. यापैकी खासदारांच्या स्थानिक विकास निधीतील १८ लाख रुपयांच्या विकास कामांचे आज सोमवारी सकाळी खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

     याप्रसंगी साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, नगरपंचायतचे गटनेते शैलेंद्र दफ्तरी, नगरसेविका कविता काटोले, नगरसेविका गिता रामगडीया, नगरसेवक राजेंद्र मिश्रा, नगरसेवक दिनेश माहुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक बिसेन आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक सतरामध्ये आठ लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे तर प्रभाग क्रमांक सहा बेलगांव जोशीनगर येथील स्मशानभूमीत तीन लाख रुपयांच्या शेडचे तसेच नालंदा बौद्ध विहार परिसरातील सभागृह बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालय याकरिता सात लाख रुपयांच्या विकास कामाचे आज भूमीपूजन करण्यात आले. दरम्यान साहसिक जनशक्ती संघटनेच्या नगरसेविका कविता किशोर काटोले यांच्या निवासस्थानी खासदार रामदासजी तडस यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच नगरसेविका गिता रामगडीया यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नालंदा बौद्ध विहारात खासदार रामदासजी तडस यांचा स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सन्मान केला.

      यावेळी किशोर काटोले, संजय धोंगडे, सचिन धानकुटे, सागर काटोले, प्रकाश कोटंबकार, बाळा टालाटुले, संतोष कोटंबकार, स्वपनिल कोटंबकार, मंगेश रामटेके, जगदीश रोकडे, रमेश घुमडे, संगिता बिसेन, माया टेंभुर्णे, शुभांगी नंदेश्वर, लिला जाधव, दिपाली नंदेश्वर, नालंदा बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष आकाश नंदेश्वर, कमलेश लटारे, प्रविण गणवीर, स्वपनिल चौधरी, कैलास नंदेश्वर, मोहन लटारे, आयुष नंदेश्वर, सोनू नंदेश्वर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे