समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स पेटली : 25 जणांचा होरपळून मृत्यू : मृतांत 14 प्रवासी वर्ध्याचे
किशोर कारंजेकर
वर्धा : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सने दुभाजकाला धडक दिल्यानंतर लगेच पेट घेतलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 25 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. बुलढाण्याच्या सिंदखेड (राजा) परिसरात आज रात्री दीड वाजता हा अतिशय दुर्दैवी अपघात घडला. मृत्यू झालेल्या प्रवाश्यात वर्धा येथील 14 प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्स ही नागपूर येथून काल दुपारी चार वाजता निघाली होती. कारंजा (लाड) येथून जेवन घेऊन ती पुण्याकडे रवाना झाली होती. या ट्रॅव्हल्समध्ये दोन चालक, एक क्लीनर आणि 30 प्रवासी, असे एकूण 33 महिला, पुरुष आणि बालक प्रवास करीत होते. ट्रॅव्हल्सचा टायर फुटून ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकली नंतर पलटी झाली मग ट्रॅव्हल्सने पेट घेतला, असा हा घटनाक्रम असल्याची माहिती ट्रॅव्हल्सच्या चालकाने दिली आहे. जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
गोंड प्लॉट येथील एकाच कुटुंबातील ४ जणांचा सहभाग
वर्धा : वर्धेतून पुण्याकडे जाताना झालेल्या प्रवाशांमध्ये अवंती पोहनकर, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी सर्व रा. वर्धा, तसेच संजीवनी गोटे रा. अल्लीपूर ही नावे पुढे आली. त्यांची नेमकी स्थिती कळलेली नाही. वर्धेतून बसलेला एक प्रवासी हिमाचल प्रदेश येथील असल्याचे सांगण्यात येते तर वर्धेतील गोंड प्लॉट भागातील एकाच कुटुंबातील चार जणांचा या अपघातात असल्याची माहिती आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नागपूर, वर्धा, यवतमाळचे प्रवासी होते. त्यातलीच एक होती प्रणिता पौनिकर यांची कन्या अवंतिका. नोकरीच्या निमित्ताने अवंतिका पुण्याला चालली होती. मात्र आता तिचं काय झालं असेल? या काळजीनेच प्रणिता पौनिकर यांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. तसंच मला तिथे घेऊन चला असा आर्त टाहो त्यांनी फोडला आहे.
बुलढाणा बस अपघातात समावेश असलेल्यांत वर्धा शहरातील कृष्णनगरातील वृषाली वनकर, शोभा वनकर, ओवी वनकर आणि श्रेयस पोकळे तसेच साईनगर येथील राधिका खडसे, स्वागत कॉलनीतील श्रेया वंजारी, फुलफैल येथील तनिष्का तायडे, आर्वी नाका येथील प्रथमेश खोडे, गिताई नगर येथील अवंती पोहणकर, अल्लीपूर येथील संजीवनी शंकरराव गोटे, झडशी येथील करण बुधबावरे, पवनार येथील सुशिल खेलकर, आर्वी येथील राजश्री गांडोळे, हिमाचल प्रदेश येथील परंतु सध्या वर्धा येथे वास्तव्यास असलेल्या पंकज रमेशचंद्र ह्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
आवाहन
नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स (MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा मौजा पिंपळखुटा, तहसील सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे समृद्धी महामार्गवरती २ वाजताच्या सुमारास अपघात झाला असून सदर बसमध्ये वर्धा जिल्हातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती बुकिंग ऑफिस कडून प्राप्त झाली. यामध्ये प्रवाश्यांचे संपूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही. सदर बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (07152-243446) अथवा शुभम घोरपडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8888239900) यांच्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
total there were 33 passengers out of which 25 have lost their life, 3 seriously injured and 5 have minor injuries.
– Senior police officials on Buldana accident
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साडेनऊ बजे बुलढाणा निकाल रहे है सुबह साडेनऊ बजे ठाणे निवास से छत्रपती शिवाजी एअरपोर्ट से बुलढाणा के लिए रवाना हो जायेंगे