Breaking
ब्रेकिंग

पिंपळाच्या ५१ डेरेदार वृक्षांची लागवड..! सेलू तालुका मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

2 2 5 3 6 6

सचिन धानकुटे

सेलू : – शहरातील तीनही स्मशानभूमी तथा बेलगांव येथील उत्तर वाहिनीच्या परिसरात आज सेलू तालुका मित्र परिवाराच्या वतीने पिंपळाच्या ५१ डेरेदार वृक्षांची लागवड करण्यात आली.

शहरातील तीनही स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हातान्हात उभं राहावं लागतं होत. नेमकी हीच बाब हेरून सेलू तालुका मित्र परिवाराच्या पुढाकाराने सदर परिसरात डेरेदार पिंपळाच्या वृक्षांची लागवड करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. याकरिता हिंगणघाट येथील नर्सरीतून ५१ डेरेदार वृक्षांची खरेदी केली. जमिनीत पोटभर पाऊस होताच आज ता.१ जुलै रोजी सदर वृक्षांची शहरातील तीनही स्मशानभूमी परिसरात तसेच बेलगांव येथील श्री क्षेत्र उत्तर वाहिनीच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आली.
याप्रसंगी यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप काळे, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, अँड रामप्रसाद लिल्हारे, पत्रकार सतीश वांदिले, संजय धोंगडे, अनिल वांदिले, सचिन धानकुटे, अभय बेदमोहता, उत्तम राऊत, किशोर धुर्वे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सेलू तालुका मित्र परिवाराच्या सदस्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी आणि आपल्या परिसराला हिरवगारं व ऑक्सिजनयुक्त करण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सेलू तालुका मित्र परिवाराचे निरज दुबे, दिलीप खडसे, वैभव वाघमारे, डॉ शुभम कोटंबकार, प्रविण इंगळे, अर्पित बडेरे, श्याम खडसे, सुधाकर भलावी आदिंनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 3 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे