Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची अशीही कर्तृत्त्व नवलाई : पाच फुटांच्या खोलगट भागात फिरविला सा़डेसहा फूट रुंदीचा रोलर : सांगा ! जनतेच्या पैशाची अशी वाटमारी सहन करायची : कार्यकारी अभियंता पेंदे म्हणतात, चेक & फाऊंड करेक्ट

2 6 6 6 2 8

किशोर कारंजेकर

वर्धा : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कारभाराचे किंबहुना जनतेच्या पैशाच्या लुटीचे एकापेक्षा एक चढत्या श्रेणीच्या दुर्गुणाचे पुरावे ठरणारी कागदपत्रे सातत्याने हाती येत असून अलीकडेच हाती आलेल्या तीन मोजणीपुस्तकांच्या झेरॉक्सप्रतितील नोंदी डोळे विस्फारूनच टाकणार्‍या आहेत.या मोजणीपुस्तकांत कनिष्ठ अभियंत्यांनी केलेल्या मोजमापावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या उपविभागीय अभियंत्यासह बांधकाम विभागाच्याच कार्यकारी अभियंत्यांनी `चेक & फाऊंड करेक्ट`ची नोंद करीत स्वाक्षरी केल्याने यांच्या कारभाराची कीव करावी तेवढी थो़डीच आहे.

वर्धा बांधकाम उपविभागातील ८२५६ क्रमांकाच्या मोजणीपुस्तकातील पान क्रमांक २ वर यातील काही नोंंदी आहेत. यातील नोंदी कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याकडून करून घेतलेल्या आहेत. याशिवाय काही पानांवरील नोंदीही वादग्रस्त नव्हे तर लूटमारीच्या साक्षीदार आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग वर्धा, येथे सिमेंटरस्त्याच्या कामाच्या या नोंदी आहेत. या रस्त्याच्या बाजूची जागा दीड मीटर रुंदीची दाखविली आहे. हा रस्त्याचा खोलगट भाग आहे. या भागावर कॉम्प्रेसर व्हायब्रेटर रोलर फिरविल्याचे दाखविले गेले. कॉम्प्रेसर व्हायब्रेटर रोलरची रुंदी ६.६० फूट असते. मग तो साडेपाच फूटाच्या खोलगट भागात कसा फिरला, याचे उत्तर कार्यकारी अभियंत्यांसह उपअभियंत्यानेही द्यायला पाहिजे. कंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते. थोडी जरी खंत, खेद असेल तर बूक ऑफ कन्स्ट्रक्शनयांनी पुन्हा वाचून पाहावे. प्रशासकीय राजवटीत अलीकडे जिल्हा परिषदेच्या कारभाराचे जे धिंदवडे निघायला लागले ते पाहता, कोठेतरी आमदारांनी सावध होत या जनतेच्या पैशाच्या लुटीचा जाब विचारला पाहिजे. काहीही नोंदी करून पैसे लाटायचे, ते आपसात वाटून घ्यायचे आणि संपत्तीवरील सूज वाढवायची, असा एककलमी कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चालविला असून त्याकरीता वाट्टेल ते करायची, यांची तयारी आहे. या कामाचे एकूण किमान १० लाखाचे देयक फटक्यात मंजूर झाले आहे. यातील कोणाचा वाटा किती, हे कोणी सांगणार नसले तरी त्याची चर्चा सुरूच आहे. त्यामुऴेच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कागदपत्रे बाहेर जाऊ नयेत, याकरीता`बी अ‍ॅलर्ट`चा कनिष्ठ अभियंत्यांच्या ग्रॅुपवर संदेश पाठविला तरी मोजणी पुस्तकांतील खोट्या नोंदीद्वारे देयक काढल्याच्या मोजणी पुस्तकाच्या झेरॉक्स प्रतिंचा ढीग यायला लागला आहे. याशिवाय याच कनिष्ठ अभियंत्याने केलेल्या याच रस्त्याच्या इतर कामाच्या नोंदी वेगळ्याच नव्हे तर वंगळ आहेत.
जिल्हा परिषदेत सध्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍याची प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यांना रस्त्याच्या कामाबाबत तांत्रिक माहिती नसेल, याची पुरती खात्री बाळगून जिल्हा परिपदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने त्यांना पाहिजे तशा ऑर्डर काढून घेतल्या आहेत. त्याद्वारे जनतेच्या पैशाची साठमारी सुरू झाली आहे. नागपूरच्या मानेवाडा परिसरात याच कमाईच्या पैशातून इमले चढविण्याचे काम सुरू झाले आहे.

प्लंबरला नळफिटिंगच्या कामापासून वेगऴे करीत त्याला टेंडरक्लर्कच्या खुर्चीत बसवून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने त्यांच्या मर्जीतील कनिष्ठ अभियंत्यांना कामाची जबाबदारी सोपवित हे सारे प्रकार सुरू केले आहेत. कायम नोकरीतील कनिष्ठ अभियंत्यांना बाजूला सारून कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याकडे कामे सोपवित इप्सित साध्य करायचे, हा गंभीर प्रकार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सुरू आहे. प्लंबरला टेंडरक्लर्कची जबाबदारी सोपविल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासकांना आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

आता नव्याने मोजणीपुस्तक क्रमांक ८२५६ आणि ७८३३ मधील सर्व नोंदिच्या झेरॉक्सप्रति हाती आल्या आहेत. याशिवाय मोजणीपुस्तक क्रमांक ७२१० आणि ८०६७ सह काही मोजणीपुस्तकांच्या झेरॉक्सप्रति हाती आल्या आहेत. याशिवाय बांधकामच्या कारंजा उपविभागातील मोजणीपुस्तकांच्या झेरॉक्सप्रति आहेत. कितीही ‘मलमकरी’ केली किंवा शासकीय निधीच्या लुटीकरीता मीच नंबर `वन` म्हणत तस्करी कारभार केला तरी यातील गैरप्रकारांना वेगाने वाचा फुटायला लागली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे