Breaking
ब्रेकिंग

दीपचंदच्या विद्यार्थ्यांचा बाल संसद निवडणुकीत उत्सफूर्त सहभाग ; राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन

2 2 5 3 5 5

सचिन धानकुटे

सेलू : – विद्यार्थ्यांना मतदार आणि मतदान प्रक्रिया ज्ञात व्हावी, या उद्देशाने येथील दीपचंद चौधरी विद्यालयात बाल संसद निवडणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्यावर येथील शिक्षक राजेंद्र उमक यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी तहसीलदार स्वपनिल सोनवणे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षकांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक देखील केले.

      राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालयात बाल संसद निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला. याकरिता इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्सफूर्त असा सहभाग नोंदविला. येथील शिक्षक राजेंद्र उमक यांच्या संकल्पनेतून हा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहा पदासाठी अठरा विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून संधी देण्यात आली. त्यांना शिक्षकांकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. याकरिता १०० विद्यार्थीनी व ११३ विद्यार्थी असे एकूण २१३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ऐन निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना तहसीलदार सोनवणे यांनी प्रत्यक्ष शाळेत भेट दिली. त्यांनी देखील शिक्षकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत यावेळी मतदार असलेल्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न देखील विचारलेत. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे, उपमुख्याध्यापिका मकरंदेसह शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

      सदर बाल संसद निवडणूक कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक राजेंद्र उमक यांनी तर मतदान प्रक्रिया इंगोले सर, ढोरे सर, भोमले मॅडम यांनी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निवडणुकीत मतदान करण्याचा आणि संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 3 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे