Breaking
ब्रेकिंग

शाळकरी विद्यार्थीनीस पळवून नेणारा “मजनू” गजाआड, सेलू पोलिसांनी नाशिक येथून घेतले ताब्यात

2 5 4 4 4 7

सचिन धानकुटे

सेलू : – शाळकरी विद्यार्थीनीस फूस लावून पळवून नेणाऱ्या मजनूस सेलू पोलिसांनी नाशिक येथून काल सोमवारी ताब्यात घेतले. किरण उर्फ सनी विष्णू पगारे(वय२१) रा. सामनगांव, राजवाडा चौक, नाशिक असे अटक करण्यात आलेल्या “त्या” मजनूचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू पोलीस ठाण्यात २१ फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर मुलगी सकाळी साडेदहा वाजता शाळेत पेपर सोडवण्यासाठी जात असल्याचे सांगून घरुन गेली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेत तपासाला गती दिली. दरम्यान तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रविण भोयरसह त्यांच्या पथकाने सदर मुलीचे नातलग, शाळेतील शिक्षक व मित्रमैत्रिणीची झाडाझडती घेतली. यावेळी नाशिक येथून एक सनी नामक मजनू यायचा आणि तीच्याशी वार्तालाप करायचा अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान एवढ्याशा माहितीच्या आधारे तपास पथक नाशिक येथे रवाना झाले आणि त्यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारावर नाशिकच्या राजवाडा चौक परिसरातून सोमवार ता.११ रोजी आरोपी मजनू सनीला ताब्यात घेतले. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरील ओळखीतून सदर मुलीशी आरोपीने संपर्क केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण भोयर, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, महिला पोलीस शिपाई रुखसाना शेख यांनी केली.

3.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे