Breaking
ब्रेकिंग

आयपीएल सट्टा प्रकरणातील लाभार्थ्यांची गोची ; सुनिल सावरकरच्या १५ सहकाऱ्यांवरही कारवाई

2 0 0 4 7 4

सचिन धानकुटे

सेलू : – पोलिसांच्या धडक कारवाईनंतर आयपीएलच्या सामन्यांवर मोबाईलच्या माध्यमातून सट्टा खेळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पोलिसांनी टाकळीच्या सुनिल सावरकर ह्याच्यावर कारवाई केल्यानंतर त्याच्याशी संबंधित १५ सहकाऱ्यांवर देखील कारवाई केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली.

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री टाकळी (झडशी) येथील सुनिल मधुकरराव सावरकर(वय३७) ह्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई केली होती. पोलिसांनी सुनिलच्या मोबाईलची पडताळणी केली असता NICE 24 pro, TATA 999.fun व Dubai Exchange.in या त्याच्या वेगवेगळ्या आयडीमध्ये अनुक्रमे १५ लाख, ५० लाख व २५ लाख रुपये क्रेडीट असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सदर आयडीमध्ये कोणकोण तसेच किती जणांचा सहभाग आहे, ह्याची सखोल माहिती घेतली असता जवळपास १५ सहकारी ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळत असल्याचे दिसून आले. यात सेलू येथील कपूर कराटे, अमोल उमाटे, अनिल बिलदाणी, तुषार लोखंडे, घनश्याम संगताणी, अवि डांगे, शैलेश पेटकर, पुलगांव येथील आसिफ भाई, मयूर येंडे, निरज ढगे, केळझर येथील निलेश घवघवे, श्रेयश बजाईत, सुरज तेलरांधे, गणेश दांडेकर व घोराड येथील संजय उमाटे यांचा समावेश आहे. यातील सगळे आयपीएलच्या सामन्यात ऑनलाइन पद्धतीने क्रिकेट जुगारावर हारजितचा खेळ खेळत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी याप्रकरणी सोळाही आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करीत एकूण १ लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्यांत चांगलीच धडकी भरल्याची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथकाचे प्रमुख संदीप कापडे, रोशन निंबाळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, स्मिता महाजन, अंकित जिभे, प्रफुल्ल वानखेडे आदि पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 0 4 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे